ब्रेकिंगमहाराष्ट्र
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ
पुणे

पुणे येथील हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क हे देशातील आघाडीचे आयटी केंद्र. देशातील सॉफ्टवेअर निर्यातीत त्याचा वाटाही खूप मोठा. पुण्याचे नाव जागतिक नकाशावर कोरणारे हे आयटी पार्क आता वेगळ्याच आणि धक्कादायक प्रकारामुळे चर्चेत आले आहे.
एका आयटी कंपनी रातोरात कार्यालय बंद करून गाशा गुंडाळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे कंपनीत काम करणारे सातशे आयटी अभियंते रस्त्यावर आले आहेत.




