ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने भव्य सत्कार समारंभ संपन्न

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

डाॅ प्रविन सरदार यांचे यश आकाशाला गवसणी घालणारे – भाई कैलास सुखधाने..

बुलढाणा  मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित डॉक्टर प्रवीण सरदार यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी प्रविण सरदार यांना आंतरराष्ट्रीय जनसंख्या विज्ञान संस्थान (आय आय पी एस) मध्ये 2023-2024 व 2024-2025 या बॅचेस चा 65 वा व 66 वा दीक्षांत समारोह सोहळ्यात देशाचे महामहिम उपराष्ट्रपती मा जगदिश धनखड साहेबांच्या हस्ते दिल्ली येथे नूकताच पार पडला.

यावेळी भाई कैलास सुखधाने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, दिक्षांत सोहळ्यात मेहकर येथील डाॅ प्रविन सरदार यांचा उपराष्ट्रपती यांच्या हस्ते दोन प्रमाणपञ देवून गौरव करण्यात आला. त्यांचे हे यश आकाशाला गवसणी घालणारे आहे .

असे गौरवोद्वगार भीमशक्तीचे राज्य सचिटणीस भाई कैलास सुखधाने हे तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मेहकर येथील अशोका हाॅल मध्ये आयोजीत सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जेष्ठ नेते सोपाणराव देबाजे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई कैलास सुखधाने, कार्यक्रमाचे आयोजक तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, नितिन बोरकर, महाधव सरदार, खिल्लारे साहेब, चौधरी साहेब, डी. डी. चव्हाण साहेब, छोटु गवळी, प्रकाश सुखधाने, कुणाल माने, शुभम सावळे,आकाश इंगोले, अतुल गवई, विशाल वानखेडे, धिरज देशमुख, सुमित मोरे, अनिल जगताप, उमेश पवार व महिला आघाडीच्या राष्ट्रीय सचिव कांचन मोरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आसमा आत्राम,राष्ट्रीय सदस्य वंदना माने, दिक्षा जमधाडे, लक्ष्मी कस्तुरे, प्रतिभा गवई, व या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन युनुस भाई पटेल यांनी केले व आभार प्रदर्शन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले, यावेळी मोठ्या संख्येने समस्त बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे