ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण, बांधकाम व्यावसायिक अटकेत..

अहिल्यानगर

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटी रूपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला अटक केली. रूपेश सूर्यकांत भन्साळी (वय 49, रा. स्वारगेट, पुणे) असे त्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून, त्याला आज (गुरूवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

ही अटक पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शैलेश अग्रवाल याच्यासह इतर आठ जणांनी बँकेतून घेतलेल्या 10 कोटी रूपयांच्या कर्ज प्रकरणाशी संबंधित आहे. या संशयितांनी कर्ज बांधकाम व्यवसायासाठी घेतले असतानाही ते इतरत्र वापरण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.

कर्जाची परतफेड न करता, त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले. अग्रवाल व त्याच्या भागीदारांचा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून शोध सुरू होता. पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुण्यात धाड टाकून भन्साळी याला बुधवारी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेतील कर्ज घोटाळा गेल्या काही महिन्यांपासून गाजत असून, यापूर्वी अनेक संचालक, कर्जदारांना अटक करण्यात आली आहे. सुमारे 291 कोटी रूपयांचे कर्ज विविध प्रकारे मंजूर करून त्याचा गैरवापर केल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखीही अनेकांची चौकशी सुरू असून, इतर संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे. भन्साळीच्या अटकेनंतर इतर भागीदारांचा शोध घेतला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे