ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश, तब्बल २४ मोटारसायकली जप्त…..

अहिल्यानगर व नेवासा येथून चोरी केलेल्या मोटारसायकलींची भािंगरमधून विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून 24 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या.

असिफ इकबाल सय्यद (रा. रंगारगल्ली,हल्ली रा.आलमगीर भिंगार) आणि आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख (रा. प्रबुध्दनगर, आलमगीर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी विशेष पथकाला तपासाचे निर्देश दिले. गुन्हे शोध शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश देशमुख यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असिफ इकबाल सय्यदचा मागमूस शोधला. त्याला भिंगारमधून ताव्यात घेत चौकशी केली. मोटारसायकली चोरीची कबुली देत त्याने चोरीच्या मोटारसायकली आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख याच्याकडे विक्रीसाठी ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी आज्याचा शोध घेतला असता तो जामखेडला असल्याचे समजले. पोलिस पथकाने जामखेडमधून आज्याला ताब्यात घेत चौकशी करता त्याने मोटारसायकली चोरीची कबुली दिली.दोघांची चोरी केलेल्या 24 मोटारसायकली हस्तगत केल्या.

कोतवाली पोलिसांत दाखल मोटारसायकल चोरीच्या फिर्यादीची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी कोतवाली पोलिसांनी विभागीय प्रादेशीक परिवहन विभागाकडे पत्र व्यवहार केल्याचे पोलिस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे