ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

योगिराज गाडे यांनी उघड केला आहिल्यानगर महापालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचा ढिसाळ कारभार

अहिल्यानगर

आहिल्यानगर शहरातील स्वच्छतेची अत्यंत बिकट आणि चिंताजनक परिस्थिती उघड करत माजी नगरसेवक योगिराज गाडे यांनी आहिल्यानगर महापालिकेच्या निष्क्रीय आणि दिशाहीन स्वच्छता व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे.

शहराच्या विविध भागांत कचऱ्याचे ढिग, दुर्गंधी, भटक्या जनावरांचा संचार आणि वाढत्या अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्वच्छतेचे केवळ फोटोसेशन करून किंवा बातम्यांमध्ये झळकून शहर स्वच्छ होत नसल्याची जाणीव करून देत गाडे यांनी सांगितले की महापालिकेने प्रत्यक्ष नियोजन, व्यवस्थापन आणि कडक जबाबदारी निश्चित करूनच शहराच्या स्वच्छतेत सुधारणा घडवू शकते.

त्यांनी आरोप केला की नुकत्याच मोठ्या प्रमाणावर भरती झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता विभागाऐवजी इतरच कामांवर लावण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर साफसफाईसाठी आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नाही. महापालिकेकडे ८० पेक्षा अधिक कचरा संकलन गाड्या असूनही त्या अनेक भागांत दिसत नाहीत, हे प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर अपयश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कचऱ्यावर गुरे–ढोरे आणि कुत्री फिरत असल्याने परिसरात अस्वच्छता तर वाढतेच आहे, शिवाय संसर्गजन्य आजारांचा वास्तविक धोका निर्माण झाला आहे. ऑनलाइन आणि फोनद्वारे नागरिकांच्या तक्रारी होत असूनही महापालिकेची कारवाई अत्यंत ढिसाळ असल्याची टीका त्यांनी केली.

योगिराज गाडे यांनी आयुक्तांना आवाहन केले की दररोजच्या कचरा संकलनाचे रूट चार्ट, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, गाड्यांची प्रत्यक्ष फेरी, परिसर निरीक्षण आणि जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी याची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा शहराची परिस्थिती आणखी गंभीर होईल.

नागरिकांनीही योग्य ठिकाणीच कचरा टाकून आणि तक्रारी नोंदवून प्रशासनाला जबाबदार धरणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “स्वच्छ आहिल्यानगर हे सर्वांचे स्वप्न नसून सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शहराच्या हितासाठी महापालिकेने तातडीने निर्णायक पावले उचलावीत, अशी मागणी केली.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे