ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका मुक्त, शांततापूर्ण व नि:पक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी मतदानापूर्वीचा दिवस, मतदानाचा दिवस व मतमोजणीचा दिवस या तिन्ही दिवशी ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, जामखेड आणि श्रीगोंदा या ११ नगर परिषदांमध्ये तसेच नेवासा नगरपंचायतीमध्ये मतदान होणार आहे.

तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबर (मतदानापूर्वीचा दिवस), २ डिसेंबर (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर (मतमोजणी पूर्ण होईपर्यंत) सर्व मद्य, ताडी व इतर अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांवर महाराष्ट्र मद्यनिषेध व अबकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे