ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी होणार, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

अहिल्यानगर

अहिल्यानगर  जिल्ह्यातील घटते लिंग गुणोत्तर रोखण्यासाठी सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची अचानक तपासणी, संशयित प्रकरणांची चौकशी व जन्म–मृत्यू नोंदी वेळेत करण्याच्या कडक सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या. कोणत्याही केंद्राकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एचपीव्ही लसीकरण कृती दल, नियमित लसीकरण, लिंग गुणोत्तर, गर्भलिंग तपास प्रतिबंधक कायदा (PCPNDT), जन्म–मृत्यू नोंदणी, क्षयरोग नियंत्रण व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीष राजूरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रवींद्र कानडे, कार्यक्रम अधिकारी संजय कदम, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, सर्व पंचायत समित्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे