ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पापांचा हिशोब करुन जाणार.. लालबागच्या मंडळाचा माज राजानेच मोडला! विसर्जन रखडताच भक्त संतप्त, मंडळावर रोष

मुंबईत असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन अद्याप झालेलं नाही. राजाच्या विसर्जन मिरवणुकीला काल दुपारी सुरुवात झाली. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. त्याला आता २४ तास उलटून गेलेले आहेत. अनंत चतुर्दशी काल होती. पण आजची संध्याकाळ होत आली तरी राजाचं विसर्जन झालेलं नाही.

बाप्पााच्या विसर्जनात येत असलेली विघ्नं पाहून भक्त कासावीस झाले आहेत. काही चुकलं असेल तर क्षमा मागतो. आमच्या चुका तुझ्या पोटात घे. आम्हाला माफ करा, अशी आर्त विनवणी भाविकांनी सुरु केलेली आहे. राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर नेटकऱ्यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला अक्षरश: धारेवर धरलं आहे. राजाच्या मंडपात, त्याच्या डोळ्यांदेखत त्याच्याच भक्तांना दिल्या जाणाऱ्या वर्तणुकीकडे अनेकांनी बोट ठेवलं आहे.

लालबागचा राजा गेल्या सहा तासांपासून गिरगाव चौपाटीवर आहे. राजाची निम्मी मूर्ती पाण्यात, तर निम्मी मूर्ती पाण्याबाहेर आहे. राजाच्या विसर्जनाला आणखी एक तास लागू शकतो. संध्याकाळी सहानंतर राजाचं विसर्जन होण्याची दाट शक्यता आहे. राजाच्या विसर्जनात अनेक अडथळे येत आहेत.

यंदा राजासाठी गुजरातवरुन अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे. विसर्जनासाठी सगळ्या सोयी करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही राजाचं विसर्जन रखडलेलं आहे. विघ्नहर्त्याच्याच विसर्जनात येत असलेली विघ्नं पाहून नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी उसळते. त्यावेळी भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक अनेकदा टिकेचा विषय ठरली आहे. सामान्यांना आणि व्हिआयपींना राजाच्या दरबारात दिल्या जाणाऱ्या वागणुकीत जमीन अस्मानाचा फरक आहे.

राजाचं विसर्जन रखडल्यानंतर अनेकांनी याच गोष्टीकडे बोट दाखवलं आहे. ‘लोकांना लाथा मारून , एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते शिवीगाळ करणारे कार्यकर्ते असल्यावर कसा राजा जाईल सांगा. सर्व कार्यकर्त्यांनी हात झोडून माफी मागायला पाहिजे. तरच राजा विसर्जनाला जाईल’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया राजाच्या व्हिडीओखाली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत..

‘लालबागचा राजा विसर्जित होत नाही.. अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. जिच्या बापाला लालबागच्या राजाचे पदाधिकारी कुत्र्यासारखे लहानमुली समोर मारतात.. त्या बापलेकीची माफी मागून जरी लालबागचा राजा विसर्जित झाला नाही तर…

मुंबईत आलेल्या मराठा बांधवांचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केल्याने त्याला दुःख झाले आहे. त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा… सामान्य भक्तांना त्याच्यासमोर प्रचंड मारहाण झाली आणि VIP लोकांना त्याच्यासमोर स्पेशल टाइम दिला.. याबद्दल मंडळाने माफी मागावी सामान्य लोकांची अशा अर्थाच्या प्रतिक्रियादेखील वाचायला मिळत आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे