ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भटक्या कुत्रांबाबत त्वरित कारवाई करण्यात बाबत निवेदन-ॲड.ऋग्वेद महेंद्र (भैय्या) गंधे

अहिल्यानगर

मागिल काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे.. तसेच नागरिकांमघे अत्यंत भीतीचे व चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागात हे कुत्रे समूहाने संघटित होऊन रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास देत असतात,अंगावर धावून जातात ,तसेच बऱ्याच वेळेस हे कुत्रे चावा घेतात त्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते.

तसेच बऱ्याच ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की काही लोक या कुत्र्यांना नको त्या गोष्टी खायला देतात व त्यामुळे कुत्रे पिसाळण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

नुकतेच २ दिवसांपूर्वी एका २ वर्षाच्या लहान मुलीला कुत्र्यांनी चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली असून आमची आपल्याला नम्र विनंती आहे की त्वरित या बाबत कारवाई करण्यात यावी व ठोस उपाययोजना करून लवकरात लवकर योग्य ते उपाय करावेत..

ह्या बाबतचे निवेदन ॲड.ऋग्वेद महेंद्र ( भैय्या ) गंधे यांनी माननीय महापौर सौ.ज्योतीताई अमोलजी गाडे व माननीय आयुक्त यशवंतजी डांगे साहेबांनी दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे