ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाजाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार -डॉ. सूर्यप्रकाश कोठे

अहिल्यानगर

पद्मशाली समाज अहिल्यानगर च्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कोठे यांचा सन्मान 

अखिल भारतीय पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे अध्यक्षपदी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांची निवड झाल्याने सोलापूरहुन अहिल्यानगर येथे भेटीसाठी आले असता अहिल्यानगर पद्मशाली पंचकमिटी समाजाच्या वतीने अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे मा.उपाध्यक्ष दत्तात्रय रासकोंडा यांनी त्यांचा सन्मान केला..

या वेळी त्यांच्या सोबत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.नगरसेवक शशिकांत कैची, खजिनदार श्रीनिवास चिलका, उद्योजक यलाप्पा गड्डम, नरसिंग कोडम, संगमनेर येथील मा. नगरसेवक सिद्राम दिड्डी व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाचे मा.उपाध्यक्ष दत्तात्रय रासकोंडा येथील , पंचकमिटी चे पुरषोत्तम बुरा, ऍड. राजू गाली, विनोद बोगा, गणेश चेन्नुर, पुरषोत्तम सब्बन, श्रीनिवास रासकोंडा, प्रविण दिड्डी आदी उपस्थित होते.

या वेळी सत्कारास उत्तर देतांना डॉ. कोठे म्हणाले अहिल्यानगर येथे पद्मशाली समाज मोठा आहे अनेक क्षेत्रात विखूरलेला आहे, समाजाची एकी नसल्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास खुंटलेला आहे यासाठी माझ्या पदाचा उपयोग अहिल्यानगर येथील पद्मशाली समाजाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार असे डॉ. कोठे म्हणाले.

या वेळी मा. नगरसेवक कैची म्हणाले आम्ही सोलापूरहुन अहिल्या नगर येथे सोलापूर पद्मशाली समाजाची माहिती देण्यासाठी आलो असून सोलापूर येथे पद्मशाली समाजाची एकी असल्यामुळेच समाजाचा आमदार, महापौर व 18 नगरसेवक निवडून आलेले आहेत या प्रमाणेच नगर येथेही एकी होणे गरजेचे असून आम्ही आ. कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचकमिटी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी करताना म्हणाले की, नगर येथे समाजाची एकी नसल्यामुळेच समाजाला सर्वच स्तरातून नुकसान होत आहे. परंतु आम्ही कमिटी मध्ये सदस्य पदाधिकारी हे सर्व तरुण, उद्योजक, वकील व डॉक्टर असे घेतले असल्यामुळे भविष्यात नक्कीच याचा फायदा समाजाला होईल असे सांगितले.

सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत श्रीनिवास रासकोंडा यांनी केले तर आभार ऍड. राजू गाली यांनी मानले. या वेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे