ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भरदिवसा घरफोडी ७३ हजारांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या नवीपेठ परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह चांदीच्या वस्तू आणि पितळी भांडी असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

​याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी आनंद रतीलाल मुथा (वय ५२) यांचे नवीपेठ येथील टायटन शोरूमसमोर जुने घर आहे.

१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या दरम्यान फिर्यादी घराबाहेर असताना ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्याने ८ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची चांदीची समई, नाणी व इतर वस्तू तसेच १० हजार रुपये किमतीची पितळी भांडी लंपास केली.

​मुथा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक अडसरे हे करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे