ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

भररस्त्यात लेबर कॉन्ट्रॅक्टरला मारहाण

अहिल्यानगर

​अहिल्यानगर शहरातील न्यू आर्ट्स कॉलेज परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि टनक वस्तूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

या राड्यामध्ये फिर्यादीची सोन्याची चैन गहाळ झाली असून, तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी धान्य विठ्ठल काकडे (वय २०, रा. मिस्तबाग) हे २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोभे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात होते. यावेळी आरोपी पंकज पराळे हा मोटारसायकलवरून, तर ऋषिकेश पराळे हा काळ्या रंगाच्या ‘थार रॉक्स’ (क्रमांक एम.एच. १६ डी.डब्ल्यू. १०००) कारमधून आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आले. आरोपींनी फिर्यादीला गाठून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

​यावेळी एका आरोपीने काकडे यांची गळ्यातील सोन्याची चैन आणि कॉलर धरून त्यांना खाली ओढले, ज्यामध्ये त्यांची चैन गहाळ झाली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोणत्या तरी टनक वस्तूने डोक्यावर व कानामागे प्रहार करून जखमी केले. “तुला बदला घ्यायचा असेल तर कायनेटिक चौकात ये, तिथे बघतोच,” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पंकज पराळे, ऋषिकेश पराळे व इतर दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस नाईक अरुण गांगुडे पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे