ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भविष्यात जिहाद्यां पासून हिंदूंना मोठा धोका – आ.संग्राम जगताप म्हणाले

अहिल्यानगर

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे मोघालांशी संघर्ष केला त्याचप्रमाणे आता आपल्या पुढेही जीहाद्यांशी संघर्ष करण्याचे अव्हान आहे. आजपर्यंत समाजात धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घालून काम करणाऱ्यांमुळेच या जीहाद्यांचे फावले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात या धर्मनिरपेक्षांपासूनही आपण लांब राहिले पाहिजे.

हिंदू विरोधातील या जीहाद्यांचे षडयंत्र वेळीच ओळखा. भविष्यात यांच्या पासून हिंदूंना फार मोठा धोका आहे, म्हणून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र या. प्रत्येक गावागावात संजय मरकड यांचासारखा सरपंच तयार होणे आवश्यक आहे व प्रत्येक यात्रेत, गावात त्यांना बंदी होणे आवश्यक आहे. आपले देवस्थान सुरक्षित राहण्यासाठी मरकडांनी घेतलेला हा निर्णय असाच वर्षानुवर्षे पुढे चालला पाहिजे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

श्री क्षेत्र मढी गावातील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत मुस्लीम समाज्याच्या नागरिकांना दुकाने लावू न देण्याच्या निर्णयाचे समर्थन करून पाठींबा देण्यासाठी रविवारी झालेल्या विराट हिंदू सभेत अहिल्यानगरचे आ.संग्राम जगताप यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी हिंदुत्ववादी आ. महेश लांडगे, आ. मोनिका राजळे, श्रीरामपूरचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सागर बेग, हभप अशोक पालवे महाराज, मढी गावचे सरपंच संजय मरकड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी मढी पंचोक्रोशी तील नागरिकांसह अहिल्यानगर शहरातील हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी हिंदूत्ववादाच्या जोरदार घोषणा दिल्या.

आ.मोनिका राजळे यांनीही मनोगत व्यक्त करून सरपंच संजय कारकड यांचे समर्थन केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे