ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याने सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग याच्या विरुध्द पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल.

श्रीरामपूर मधील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याने सोनू ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग याच्या विरुध्द दाखल गुन्ह्यात पोक्सो कायद्याप्रमाणे कलम वाढ करण्यात आली आहे.

दिनांक 15 जुलै 2026 रोजी फिर्यादी यांनी त्यांची अल्पवयीन पिडीत मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमीष दाखवून, तिला फूस लाऊन त्याचे राहते घरातून पळून नेले असल्याबाबत तक्रार दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय हत्यार कायदा कलम 3,7,25, (6), (7) प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक असलेला आरोपी सोनु ऊर्फ जयप्रकाश अशोक बेग ( वय 40 वर्ष, रा. सरस्वती कॉलनी वॉर्ड नं.7, श्रीरामपूर) याने संबंधित अल्पवयीन पिडीत मुलीस लग्नाचे अमीष दाखवून राहत्या घरातून पळवून नेले तसेच ती अल्पवयीन असल्याचे माहिती असूनसुध्दा तिच्याशी बळजबरीने लग्न करुन तिच्याशी वारंवार लैगिंक संबंध प्रस्थापित करुन तिला गर्भवती केले आहे, असे निष्पन्न झाल्याने सदर गुन्हयात भारतीय न्याय संहिता कलम 64 (ळ) (क्ष) (ा) 140, (4) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमचे कलम 4,6 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली असून न्यायालयास सदर बाबत रिपोर्ट सादर करुन नमुद आरोपीस अटक असलेला गुन्ह्यातून या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी प्राप्त झाल्याने त्यास या गुन्ह्यातही अटक करण्यात आली आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे