ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अभिषेक कळमकर हे हनी ट्रॅपचे बळी.. त्या महिलेने पुण्यातील युवकालाही फसवलं अन् पैसे उकळले, खासदार लंकेंचा दावा

शरद पवार गटाचा शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याचे प्रकरण हे हनी ट्रॅप असल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे.

ज्या महिलेने हे आरोप केले आहेत तिने या आधी पुण्यातील एका युवकासोबतही असाच प्रकार केला. त्याच्याकडून तडजोड करून काही रक्कम उकळल्याचा दावाही लंके यांनी केला.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्याविरोधात एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच त्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील व्हायरल झालेत. त्यावर निलेश लकं यांनी प्रतिक्रिया दिली.

निलेश लंके म्हणाले की, “हा संपूर्ण प्रकार हनी ट्रॅपचा आहे. अभिषेक कळमकरवर ज्या महिलेने आरोप केले आहेत त्या महिलेने पुणे जिल्ह्यात एका युवकाबाबत असाच एक प्रकार केला आहे. त्या प्रकरणात संबंधित युवकाकडून तडजोडनामा करून काही रक्कम देखील घेतली आहे.”

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत आमदार रोहित पवारांनी संशय व्यक्त केला. याबाबत बोलताना खा. निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली असून रोहित पवारांकडून ज्या पद्धतीने मांडणी केली आहे त्यावरून या अपघाताबाबत नक्कीच संशय येत असल्याचे लंके म्हणाले.

सोबतच रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा मिळावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. त्यावर बोलताना, एखादा व्यक्ती स्पष्ट वक्ता असला की त्याला समाजातील काही दुर्जनांकडून धोका असतो, त्यामुळे रोहित पवारांना सुरक्षा मिळायला हवी असं लंके म्हणाले.

राज्यसभेच्या एका जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. राज्यसभेच्या जागेबाबत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या चर्चा सुरू असून राष्ट्रवादीला या चर्चेपासून दूर ठेवण्यात आल्याचे बोललं जात आहे.

याबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता ते म्हणाले की, “कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो पवार साहेबांना विचारात घेऊनच घेतला जातो. मधल्या काळात शरद पवार यांची तब्येत खराब असल्याने चर्चा झाली नसेल. मात्र निर्णय हा त्यांच्या विचारानेच होईल.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे