ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

गुरुवर्य पोट्यन्ना बत्तिन म्हणजे पद्मशाली समजाचा दीपस्तंभ – रविकुमार पंतंम

अहिल्यानगर

“शिक्षक हा राष्ट्र निर्माता आहे.” मला ही उत्तम शिक्षक मिळाल्याने मी आज आयुष्यात हे यश मिळवू शकलो. आपल्या समाजात अनेक तरुण उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांनी उद्योजकतेकडे वळावे, आवश्यक मार्गदर्शन करायला मी आहेच. समाज कार्याचा हा वसा आम्हाला गुरुवर्य बत्तिन यांच्या कडून मिळाला आहे.गुरुवर्य पोट्यन्ना बत्तिन म्हणजे पद्मशाली समजाचा दीपस्तंभ आहेत….!! असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगरचे सहायक आयुक्त रविकुमार पंतंम म्हणाले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील कै. गुरुवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक, सामाजिक मंडळाच्या वतीने आयोजित शिक्षकांचा सत्कार व पदविका पदवीधर विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम यांच्यासह मंडळाचे सचिव माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटिपामुल, कार्याध्यक्ष, ज्ञानेश्वर मंगलारम, प्रा. वीरभद्र बत्तीन, कृष्ण संभार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनी केले, तर मंडळाचे सहसचिव कृष्णा संभार यांनी पंतंम यांच्या परिचयातून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला.

” डॉ राधाकृष्णन, साने गुरुजी, ग प्र प्रधान यांच्यासारखेच गुरुवर्य पोट्ट्याना बत्तिन हे ध्येयवादी शिक्षक होते. शिक्षकी पेशा त्यांनी आपल्या अशिक्षित समांजाला सुशिक्षित, सज्ञान करण्यासाठी व्रत म्हणून स्वीकारला. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आयुष्यभर काम केले आणि भावी पिढीने ही त्यांच्या आदर्श विचाराचा वारसा जपायला हवा….!! असे माजी प्राचार्य बाळकृष्ण सिद्धम आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले.

यावेळी व्हिएतनाम येथे झालेल्या एशियन पॉवर लिफटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत एक सुवर्ण व एक ब्राँझ पदकाची कमाई करणाऱ्या देवदत्त प्रवीण गुंडू, नवीन शैक्षणिक धोरणाच्या पंचवार्षिक पूर्ती निमित्त दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय शिक्षा संगम कार्यक्रमात निमंत्रित अतिथी म्हणून सहभागी झाल्या बद्दल राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलारम, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्काराचे मानकरी लक्ष्मीकांत इडलवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर सेवेतील सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्काराची उद्घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारम यांनी केली. उपशिक्षिका सौ रेखा बुरा यांनी शिक्षक सत्कारास उत्तर दिले. पदविका पदवीधर व पदव्युत्तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पारितोषिकाची घोषणा सौ मीना बत्तिन यांनी केली.

आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटिपामुल यांनी केले, तर श्रीनिवास यल्लाराम व साईगीता सब्बन यांनी सूत्रसंचालन केले. या समारंभास समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनायक बत्तिन, सदाशिव बत्तिन, कुमार आडेप, शेखर दिकोंडा, श्रीनिवास वंगारी, रघुनाथ गाजेंगी, शिवाजी संदुपटला, श्रीनिवास श्रीगादी, दत्तात्रय जोग, हनुमंत जोग, बालकिसन आकूल, मारुती अरकल, सुहास बोडके, अजय न्यालपेल्ली यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे