ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रेखा जरे खून प्रकरणात जामिनावर सुटका झालेला आरोपी सागर भिंगारदिवेसह सहकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर सागर उत्तम भिंगारदिवे (रा.केडगाव, अहिल्यानगर) याने 70 ते 80 साथीदारांसह बेकायदेशीर मिरवणूक काढून फटाके फोडत, घोषणाबाजी करत वाहतूक अडथळा निर्माण केल्याचा प्रकार 20 जून 2025 रोजी सायंकाळी घडला. कोतवाली पोलीस पोहेकॉ अनिल झाडबुके (वय 30) यांच्या फिर्यादीवरून सागर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर भिंगारदिवे हा रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. 20 जून रोजी जामिनावर सुटल्यानंतर त्याने कारागृहासमोरून केडगाव बसस्थानकापर्यंत पांढऱ्या स्कॉर्पिओ (एमएच 16 बीबी 8787), काळ्या स्कॉर्पिओ (एमएच 12 एमएफ 1086), लाल स्विफ्ट कार आणि 30-40 दुचाकींसह मिरवणूक काढली.

यावेळी फटाके फोडणे, मोठ्याने घोषणाबाजी आणि बेदरकार वाहन चालवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली गेली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरुन कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गोपनीय शाखेकडून तपास सुरू असून, सागर आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे