ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या जामीनाबाबत आज न्यायालयात जोरदार युक्तिवाद

अहिल्यानगर

नगर -माजी महापौर अभिषेक कळमकर याच्या विरोधात तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याच्या वतीने जिल्हा न्यायालयात करण्यात आलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. यु.जे.मोरे यांनी १२ फेब्रुवारी रोजी फेटाळून लावला आहे. याबाबत शिरूर (जि. पुणे) येथील एका २५ वर्षीय विवाहित महिलेने २१ फेब्रुवारी रोजी पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या फिर्यादी वरून हा गुन्हा दाखल झालेला आहे.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, संबंधित महिला खासगी कामानिमित्त अहिल्यानगर येथे आली होती. सोशल मीडियावरून तिने अभिषेक कळमकर याचा मोबाईल क्रमांक मिळवून नोकरीसंदर्भात संपर्क साधला. त्यावेळी त्याने नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकने एमआयडीसी परिसरात आपली शाळा असल्याचे सांगून शाळा दाखविण्याच्या बहाण्याने तिला बोलावले. तिला एका काळ्या रंगाच्या वाहनात बसवून एमआयडीसीकडे घेऊन गेला. वाहनात असताना तिला शीतपेय दिल्यानंतर गुंगी आल्यासारखे झाले. त्यानंतर सुमसाम ठिकाणी वाहन थांबवून जबरदस्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तिने म्हटले आहे.

त्या नंतर १८ फेब्रुवारीला शिरूर येथील एका लॉज वर बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचे या फिर्यादीत म्हंटलेले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून अभिषेक कळमकर फरार आहे. त्याच्या वतीने अॅड. विकास ढोकळे यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता.

त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. यु.जे.मोरे यांच्या समोर झाली. पिडीतेचे वकील अॅड. विजय गुंदेचा यांनी अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध दर्शवत हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने जामीन देवू नये असा युक्तिवाद केला. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्या. मोरे यांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे