नगर शहारातील सावेडी उपनगरात २० वर्षी तरुणीचा पाठलाग करून अश्लील वर्तन
अहिल्यानगर

शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एका २० वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही आपल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी गेली असताना ही घटना घडली. त्या ठिकाणी राहणार्या गोरक्षनाथ तांदळे याने जुन्या भांडणाच्या कारणावरून पीडितेचा वेळोवेळी पाठलाग केला.
तसेच पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे अत्यंत घाणेरडे व अश्लील हावभाव केले. तसेच त्याने पीडितेच्या कुटुंबाला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव घेतली. तोफखाना पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
विविध कलमान्वये आरोपी गोरक्षनाथ तांदळे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार गंगावणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




