ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

जागतिक महिला दिनानिमित्त बालक मंदिरमध्ये पाककला स्पर्धा

अहिल्यानगर

८ मार्च महिलादिनाचे औचित्य साधून महिला मंडळ संस्थेतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचा विषय मुलांसाठी पौष्टिक डबा हा होता.

स्पर्धा बालक मंदिर महिला मंडळ शाळेत बुधवार दिनांक 11 मार्च रोजी घेण्यात आली .स्पर्धेला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला .यावेळी परीक्षक म्हणून सौ. सुरेखा मणियार व सौ. प्रतिमा श्रोत्री यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ .ज्योती केसकर होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योती गाडे व तसेचप्राध्यापक डॉक्टर आश्लेषा भंडारकर कलारंग अकॅडमीच्या सुजातापाय मोडे प्राचार्य गीता गिल्डा सौ छाया राजपूत ,प्रिया जानवे याकर्तबगार सत्कारमूर्ती उपस्थित होत्या.

माननीय महापौर व इतर प्रमुख अतिथींचा परिचय शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ आणि श्रीमती निरुपमा देशपांडे यांनी करून दिला. तसेच याप्रसंगी दासनवमी निमित्ताने घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेतील विजयी संघातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.

तसेच विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांनाही बक्षिसे देण्यात आली. युग करिअर तर्फे घेण्यात आलेला प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी कुमारी प्रांजल गायकवाड( दहावी )कुमारी ज्ञानदा शिंगारे (अकरावी) मिहीर घोटणकर ( पंधरावा) यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ मनीषा कुलकर्णी व सौ प्रतिभा पवार आणिसर्व सर्वांना प्रेरणा देणाऱ्या मुख्याध्यापिका सौ अस्मिता शूळ यांचा सन्मान केला गेला.

यावेळी महिला मंडळ संस्थेतर्फे सौ. मुग्धा घोटणकर सौ. प्रतिभा शिनगारे आणि सौ. गायकवाड या माता पालकांचा सत्कार करण्यात आला .

तसेच आदर्श माता पुरस्कार सौ. वैशाली धनंजय चितांबर यांना देण्यात आला . सौ.आश्लेषा भांडारकर ,सौ.छाया राजपूत, सौ.गीता गिल्डा,सौ.सुजाता औटी आणि महापौर सौ. ज्योती गाडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महापौर ज्योती गाडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पौष्टिक डबा हा विषय ठेवल्याबद्दल कौतुक केले तसेच रासायनिक खताच्या ऐवजी घरोघरी सेंद्रिय खताचा वापर करावा असे त्यांनी आवर्जून सांगितले .

त्याचबरोबर सौ भांडारकर यांनी गांडूळ खताचे महत्त्व विशद करून स्वच्छते बद्दल माहिती दिली. तसेच भाजप सचिव सौ. गीता गिल्डा यांनी महिला नवनिर्मिती शक्ती बद्दल सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन सौ .धोपावकर यांनी केले. पाककला स्पर्धा कै. सौ. रंजना मुळे यांच्या स्मरणार्थ श्री.प्रदीप मुळे यांनी प्रायोजित केली होती.

या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला .याप्रसंगी महिला मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. विद्या होळेहुन्नूर, सौ मीनल गंधे, सौ गौरी मुळे, सौ पद्मजा धोपावकर. सौ रोहिणी पुंडलिक, पुष्पा चितांबर इत्यादी उपस्थित होत्या.

पाककला स्पर्धेत विजयी झालेल्या महिलांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला मंडळ संस्थेच्या सर्व पदाधिकारी तसेच बालक मंदिर महिला मंडळ शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे