पदमशाली समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार – महापौर सौ. ज्योतीताई गाडे
अहिल्यानगर

पदमशाली समाजाच्या वतीने महापौर उपमहापौर यांचा सन्मान..
अहिल्यानगर पदमशाली समाजाच्या पंचकमिटी ज्ञाती समाज व मार्कंडेय देवस्थान कमिटीच्या वतीने अहिल्यानगर चे नवनिर्वाचित महापौर सौ. ज्योतीताई गाडे व उपमहापौर ऍड. धनंजय जाधव यांचा सन्मान सोहळ्याचे कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. नगरसेवक व पंचकमिटी चे माजी अध्यक्ष प्रकाश येनगंदुल होते या वेळी मा. नगरसेविका सुप्रिया जाधव, पंचकमिटी चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, देवस्थान चे अध्यक्ष गणेश विद्ये, सी ए सुनंदा रच्चा, उद्योजक शरद मडूर, गिरीष चिट्टा, मा. आकाशवाणी प्रमुख राजेंद्र दासरी, मनपा चे अधिकारी अंबादास साळी साहेब, स्वाती सिरसूल आदी उपस्थित होते.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना महापौर म्हणाले आज पद्मशाली समाजाच्या वतीने माझा सन्मान होतो आहे हा माझा एक उचित सन्मान असून हा समाज प्रामाणिक व कष्टाळू असल्याचे मी ऐकले होते परंतु आज मी स्वतः अनुभवलेले आहे. या समाजातील महिलांना रोजगार मिळण्यासाठी मी नक्कीच पालिकेच्या मार्फत प्रयत्न करून रोजगार उपलब्ध करून देईल.
या वेळी उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले आज माझा हा सन्मान माझ्या परिवाराने केलेला आहे.पदमशाली समाज आणि आमचे जाधव कुटुंबाचे नाते हे माझ्या आजोबा पासून असून गेले 70 वर्षांपासून आमच्या कुटुंबाचे समाजा बरोबर ऋणानुबंध आहेत आणि त्याची फेड आम्ही करू शकत नाही, परंतु मी आज उपमहापौर असून या पदाच्या माध्यमातून समाजासाठी भरीव कार्य करण्याचा माझा मानस आहे या साठी पदमशाली समाजाने मला संधी दयावी असे जाधव म्हणाले.
पदमशाली समाजाच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचे शाल श्रीफळ व त्यांचे स्थईलचित्र असलेली प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रमात सी ए सुनंदा रच्चा यांची आय सी ए आय अहिल्यानगर शाखेच्या खजिनदार पदी नियुक्ती झाल्या बद्दल सन्मान करण्यात आला.. तर सौ. दिप्ती द्यावनपेल्ली हे अहिल्यानगर केंद्रा मधून संगीत विशारद गायनमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आले.
या वेळी मा. नगरसेविका सुप्रिया जाधव, उद्योजक अमोल गाडे, सी ए सुनंदा रच्चा, सौ. दिप्ती द्यावनपेल्ली, सौ.लीना रच्चा, गणेश येनगंदूल, दत्तात्रय जोग , श्रीनिवास येल्लाराम सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बुरा सर यांनी केले, स्वागत ऍड राजू गाली यांनी केले तर आभार अमित बुरा यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होणे करिता विनोद बोगा, तिरमलेश पासकंटी, पुरषोत्तम बुरा, प्रणित अनमल, पुरषोत्तम सब्बन, रितेश अनमल आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास मनोज येनगंदुल, देविदास बिज्जा, शंकर बत्तीन, रवि दंडी, अतुल रच्चा, अमोल पद्मा, धनंजय येनगुपटला, न्यालपेल्ली, येल्लप्पा द्यावनपेल्ली व महिला मोठया प्रमाणात उपस्थित होते.




