ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगरमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई होणार, मनपा प्रशासक डॉ.पंकज जावळे अँक्शन मोडवर

अहमदनगर

शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणारास महापालिका प्रशासनाकडून पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी या विषयाबाबत आयोजीत बैठकीत दिली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त अजित निकत, सहा. आयुक्त सपना वसावा, स्वच्छता कक्ष प्रमुख परीक्षीत बिडकर, प्रसिद्धी विभाग प्रमुख नजान , हरियालीचे सुरेश खामकर, हरिभूमीचे अभय ललवाणी यांसह स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

नायलॉन मांजामुळे मनुष्य तसेच पक्षांच्या जीवित धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातलेले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

महानगरपालिका मध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती ७५८८१६८६७२ या भ्रमणध्वनीवर द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

याचबरोबर नागरिकांनी देखील जीविकास धोका निर्माण करणाऱ्या नॉयलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे