ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

संपादकीय

AR न्यूज लेडीज स्पेशल प्लॅटफॉम तर्फे मकर संक्रांती निमित्त महिलांसाठी शाॅपिंग फेस्टिव्हल ची शानदार सुरुवात

अहमदनगर

AR न्यूज च्या माध्यमातून महिलांना व्यवसायाची सुवर्णसंधी  मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन – बोज्जा मॅडम नी उपलब्ध करून दिली आहे.

आज सकाळपासून खुप महिलांची गर्दी चालू झाली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे सौ. रेणुकाताई वराडे , यशस्वी महिला उद्योजिका व संचालिका अहमदनगर किचन, H.S. सोल्युशन्स ट्रेनिंग सेंटर संचालिका व इनरव्हिल क्लब ऑफ अहमदनगर च्या प्रेसिडेंट सौ. श्रीलता आडेप, वेलवेट युनिकसेक्स सलोन संचालिका सौ. उमा बडगु, श्री.निलेश फुंदे संचालक – लक्षवेध मल्टीस्टेट को ऑप सोसायटी लि, प्रशांत दरेकर संचालक- त्रेता व्यावसायिक संस्था व त्रेता ग्रीन एनर्जीज या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले होते.

या शाॅपिंग फेस्टिव्हल मध्ये मकरसंक्रांत वाणाच्या वस्तू हलव्याचे दागिने, देवाच्या पुजेचे सामान, साऊथ इंडियन ज्वेलरी, साड्या, काॅटन कुर्ती्ज,  तसेच खाण्यासाठी वेगवेगळे फुड्स स्टॉल, आणि वेग वेगळ्या प्रकारचे ४०असंख्य स्टॉल…आणि त्या सोबत जिंका लकी ड्रॉ कुपन.

अहमदनगरांनी शनिवार व रविवार जास्तीत जास्त लोकांनी या शाॅपिंग फेस्टिव्हल ला भेट द्या.असे आवाहन AR न्यूज चॅनल च्या मुख्य संपादिका सौ श्रुती बत्तीन – बोज्जा मॅडम व AR न्यूज चॅनल चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रोहित गांधी यांनी  केले आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे