ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्यिक काव्यरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

अहिल्यानगर - महिला कुठल्याच बाबतीत कमी नाही हे आज या कार्यक्रमात दाखवून दिले..

महिला दिनानिमित्त अहिल्यानगर मधील AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित राज्यस्तरीय साहित्यिक काव्यरत्न पुरस्कार वितरण सोहळा CSRD काॅलेज, स्टेशन रोड,  अहिल्यानगर रविवार 1 मे , आयोजित करण्यात आला होता..

संपुर्ण महाराष्ट्रातून विविध भागांतून येणाऱ्या महिलांना अहिल्यानगर मंचावर सन्मानित करण्यात आला होता..गेले 2 महिन्यांपासून यांचे आयोजन, नियोजन AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम नी केले आहे..

सकाळीच बाहेर गावाहून आलेल्या महिला अहिल्यानगर मधे आल्यावर त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यावर सुंदर रांगोळीने स्वागत,फेटा, बॅच लावून त्यांचा आनंद द्विगुणित झाला..

या पुरस्कारासाठी आमंत्रित पाहुणे महिला मान्यवर – सौ. ज्योती ताई गाडे,महापौर अहिल्यानगर. सौ. मिनल ताई महेंद्र गंधे, अहिल्यानगर संचालिका कालिंदा ग्रामोद्यय संस्था, कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय देशस्त ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ दादर ,मुंबई. हिरकणी सौ.अनिता ताई नरेंद्र गुजर.लेखिका, कवियित्री, निवेदिका.राहणार- डोंबिवली, मुंबई. मराठी सिने अभिनेत्री – स्मिता भोसले धुमाळ अभिनेत्री, प्राध्यापिका, नृत्यांगणा, नृत्य दिगदर्शक, निवेदिका, आयोजिका, मॉडेल, लेखिका.राहणार- डोंबिवली, मुंबई. सौ. स्वाती ताई पांडुरंग हिरवे.शिवसेना महिला शहर संघटक.राहणार – डोंबिवली मुंबई., सौ. सिध्दी गिरीशकुमार ढोके. लेखिका, कवियत्री, निवेदिका राहणार – ठाणे, मुंबई, सौ. वैशाली मुन- चांदेकर. लेखिका,कवियित्री, समाजसेविका, संपादिका, पत्रकार.राहणार- चंद्रपूर.

या महिला मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात पुरस्कार करण्यात आले..

त्यानंतर मराठी अभिनेत्री स्मिता भोसले – धुमाळ यांची गणेशवंदना, कु. शांभवी सोनसळे – क्लासिकल नृत्य सादरीकरण झाले..

प्रमुख पाहुणे ज्योतीताई गाडे, मा. मिनल ताई महेंद्र गंधे , स्वाती ताई हिरवे, वैशाली जाधव मॅडम , मराठी अभिनेत्री स्मिता भोसले – धुमाळ यांनी आपले मनोगतुन स्री ची विविध रुप व्यक्त केले..

मा.सिध्दी ढोके यांची महिला दिनानिमित्त तु बेस्ट च.. ही कविता सादरीकरण झाले.. त्यासोबतच उपस्थित पुरस्कारार्थी महिलांनी आपले मनोगत कवितेतून मांडले..

आज महिला या कार्यक्रमात मुंबई, अमरावती, जालना, पुणे अशा विविध भागांतून आल्या होत्या.. जवळ जवळ  40 महिलांचा सन्मान होता..

अध्यक्षीय भाषण अनुताई त्यांच्या मनोगतात म्हणाले की एक बाई च बाई ची शत्रु असते..ती तिला कधीच पुढे जाऊ देत नाही.. असे अनेक उदाहरण देऊन त्या सोबतच कवितेतून प्रत्येक वाक्याचा अर्थ सांगितला..

अर्चना देवकर शिक्षिका, लेखिका, कवियित्री यांचे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.त्यानंतर उपस्थित पुरस्कारार्थी महिलांना स्टेज वर बोलवून ट्राॅफी, सर्टिफिकेट देण्यात आले..

या कार्यक्रमासाठी स्पाॅन्सर वंडर किड्स स्कूल अहिल्यानगर.विशेष सहकार्य डिजीटल पार्टनर – माझं अहिल्यानगर,अँकर प्रणाली क्षिरसागर,आदित्य ग्राफिक डिझाईनर- महेश दिक्षित , फुड पार्टनर- पाणी पुरी जलपुरी- सागर साव, व्हिडीओ पार्टनर – फिल्म एडिटिंग स्टुडिओ – दिपक गायकवाड, Rv ग्रुप- राहुल पाटोळे, ट्राॅफी पार्टनर- तुषार चोरडीया यांनी सहकार्य केले आहे..

कार्यक्रम ची सांगता सुंदर भरपेट अशा जेवणानी झाली..सौ. श्रुती बत्तीन मॅडम नी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे