ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवजयंतीनिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. पांडुरंग बलकवडे यांना “शिवराज्य पुरस्कार” प्रदान तसेच रक्तदान शिबिर आयोजन

पुणे

सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही तिथीनुसार दि. ६ मार्च रोजी शिवराज्य प्रतिष्ठाण, छत्रपति शिवाजी महाराज रोड, पुणे तर्फे शिवजन्म सोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला, यंदा प्रतिष्ठानच्या २० व्या वर्षपूर्ती निमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. पांडुरंगजी बलकवडे यांना “शिवराज्य” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, मानाची सरदार पगडी, शाल- श्रीफळ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते..

इतिहासाचे संशोधन आणि प्रसार हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठेवून त्यांनी वयाची ६६ वर्ष नुकतीच पूर्ण केली, बलकवडे हे सिंहगड विजेता नरवीर नावजी बलकवडे यांचे वंशज तसेच ते भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, श्री शिवचरित्र जागर समिती, बालभारती अश्या अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहेत, मोडी लिपीचे ते अभ्यासक आहेत.

बलकवडे म्हणाले “आजची तरुण पिढी ही पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करत असतानाच सामाजिक भान ठेवून विविध उपक्रम राबवत आहेत, माँ जिजाऊंची प्रेरणा घेऊन आजच्या महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन प्रतिष्ठान चे कार्यकर्ते इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध काम करत आहेत याचा आनंद आहे” यावेळी प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष आशिष हिंगमिरे यांनी प्रास्ताविक सादर केले.

दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले होते तसेच मोफत छातीचा एक्सरे व विविध आरोग्य चाचण्या घेण्यात आल्या या मध्ये तब्बल २१६ जणांनी सहभाग नोंदवला. प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात.

अत्तापर्यंत शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ६००० पेक्षा जास्त रक्तपिशव्याचे संकलन करण्यात आलेले आहे, उन्हाळ्या मध्ये रक्ताचा तुटवडा भासतो याची जाण ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रतिष्ठान वेळोवेळी गरजूंना मदत करते.

सकाळी ७:३० वा शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदानास प्रारंभ झाला, प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास भेटवस्तू स्वरूपात “मसाज गन” चे वाटप केले.

तसेच दुपारी १२ वा शिवजन्म सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला, यामध्ये प्रतिष्ठाणच्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी पेढे वाटून शिवजन्म साजरा केला, यावर्षी प्रतिष्ठानच्या माध्यमातून “इतिहासाची शौर्यगाथा” म्हणजेच शिवकालीन नाणी आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनात शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तसेच सायं ७ वाजता बाल-शिवभक्तांसाठी बहुचर्चित “महावतार नरसिम्हा” या चित्रपटाचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी सहभाग घेतला आणि अल्पोपहार करुन कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी भागातील सर्व मान्यवर आणि नगरसेवक यांनी प्रतिष्ठान ला भेट दिली यामध्ये मा. दीपक (बाबा) मिसाळ, सर्वश्री नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर, स्वरदा बापट, स्वप्नाली पंडित, ऐश्वर्या थोरात, मानसी मनोज देशपांडे, स्नेहा नामदेव माळवदे, गणेश कल्याणकर, राजेंद्र काकडे, अजय भोसले, शिरीष मोहिते, राम बांगड, सौरभ बाळासाहेब अमराळे आदी मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लतिश शिंदे, उपाध्यक्ष प्रसाद तेलंग, कार्याध्यक्ष प्रशांत मोरे, खजिनदार अविनाश करंजावणे आणि प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे