ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पारिजात चौक, गुलमोहर रोड परिसरातील नवीन स्ट्रीट लाईट कामाचे उद्घाटन

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यांना आज उपस्थित राहण्याचा योग आला.

आ.संग्रामभैय्या जगताप व डॉ.सुजयदादा विखे पाटील यांच्या पुढाकारातून गुलमोहर रोड परिसरातील नवीन स्ट्रीट लाईट कामाचे उद्घाटन, तसेच शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या वाहतूक सिग्नल प्रणालीच्या कामाचे उद्घाटन पार पडले.

या कार्यक्रमांना अध्यक्ष म्हणून ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती लाभली. यावेळी अहिल्यानगरच्या मा. महापौर ज्योती गाडे, यांच्यासह पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहीते,मा.महापौर बाबासाहेब वाकळे,मा.उपमहापौर अनिलभाऊ बोरुडे,राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर,नगरसेवक निखिल वारे,अजिंक्य बोरकर,ऋग्वेद गंधे ,जितू गंभीर,जय भोसले,मोहीत पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर केडगाव येथील भुयारी मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यास देखील उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. याप्रसंगी आयुक्त यशवंत डांगे,शहर जिल्हाध्यक्ष अनिल आण्णा मोहिते,नगरसेवक मनोज कोतकर,नगरसेवक मयुर बांगरे,नगरसेवक सुमित लोंढे,नगरसेवक जालिंदर कोतकर,नगरसेवक दत्ता गाडळकर,नगरसेवक महेश लोंढे,सुनिलमामा कोतकर आदी उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा वाढविण्यासाठी ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपयुक्त प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे