ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिवस आनंदात साजरा.

नांदेड

फरांदे पार्क येथील सुखमणी सेवा केंद्र येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्राच्या संचालिका बीके अनिता बहनजी व बीके सत्यवती बहनजी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सेवा निवृत्त मु.अ.सौ.उषाताई जाधव उपस्थित होत्या.

या प्रसंगी प्रास्ताविक करताना प्रा.डा.सौ.कल्पना जाधव यांनी जागतिक महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यास बीके अनिता बहनजी व बीके.सत्यवृती बहनजी यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले त्याबद्दल आनंद व आभार मानून प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक युगातील महिलांची क्षमता, कुठल्याही परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची मानसिकता यामुळे जगात स्त्री शक्तीचा जागर होत आहे.

स्त्री ला संधी दिली गेली तर ती पुरूषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्यांच्या पेक्षा ही सरस कार्य करू शकते याची अनेक उदाहरणे आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे हे स्पष्ट केले. या प्रसंगी सौ.उषाताई जाधव यांनी ही आपले विचार व्यक्त केले. बीके अनिता बहनजी व बीके सत्यवती बहनजी,सौ.उषाताई जाधव यांचे शाल,बुके देऊन सर्व उपस्थित महिलांनी स्वागत आणि सत्कार केला.

अध्यक्षीय समारोप करतांना संचालिका बीके अनिता बहनजी म्हणाल्या ‘परमपिता शिव परमात्मा चे वारस ब्रह्मा बाबा यांनी आपल्या नंतर या संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळण्याची जबाबदारी पुरूष भावांवर न सोपवता महिलांच्या शिरावर ठेवली आणि आजतागायत हे कार्य समर्थपणे ब्रह्मा कुमारी ज्येष्ठ दादीयां करत होत्या आणि त्यांच्या नंतर दिदीयां करत आहेत, यातून महिला किती सशक्त आहेत आणि त्यांच्या वर सोपविलेली जबाबदारी त्या जबाबदारीने व यशस्वीपणे पार पाडू शकतात हे वेळोवेळी सिद्ध केले आहे.’ असे मत व्यक्त केले.

त्या नंतर सर्व बहिणी आणि भावांनी दोन्ही बहनजींचा सत्कार करून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.त्यानंतर दोन्ही बहनजींच्या हस्ते उपस्थित भाऊ- बहिणींचाही सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त खास तयार करण्यात आलेला केक कटिंग चा कार्यक्रम पार पडला. शिव परमात्म्याच्या चिंतना नंतर टोली (प्रसाद) देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

या सोहळ्यासाठी फरांदे पार्क आणि परिसरातील बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन करून उपस्थितांचे आभार प्रा.डा.कल्पना जाधव यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे