मेहमूदा रसुल शेख लेखिका, कवयित्री, गझलकारा, लावणीकारा कान्हूर मेसाई यांना’पुण्यनगरी कर्तव्यसंपन्न महिला सन्मानाने सन्मानित
पुणे

8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यनगरी ने ‘पुण्यनगरी कर्तव्यसंपन्न महिला सन्मान व ऑटो कार्निवलचे आयोजन करून कर्तुत्ववान महिलांचा सन्मान केला. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
यामध्ये ‘सुपर डुपर’ चित्रपटातील अभिनेत्री ‘भिडेवाडा’ चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्री ‘आपला आवाज आपल्या सखीच्या’ संगीता तरडे मॅडम, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू पराग काळकर, पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मनिषाताई नागपुरे यांच्या उपस्थितीत मेहमूदा शेख यांना’पुण्यनगरी कर्तव्यसंपन्न महिला सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात मला सहभागी करून सन्मानित केल्या बद्दल इव्हेंट मॅनेजर मार्केटिंग हेड मा.राहुल लिमये सर यांचे व पुण्यनगरी टीमचे मनापासून आभार मानते व त्यांना पुढील कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते अशा छान शुभेच्छा देऊन मेहमूदा शेख यांनी पुण्यनगरीचे आभार मानले…




