ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

राम मंदिर उद्घाटन…२२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी

अहमदनगर

अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनादिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी भाजपने केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच राम मंदिर हा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय असल्याने या सोहळ्यात सर्व नागरिकांना सहभागी होता यावे, यासाठी ही सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

२२ जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. प्रभू राम मंदिर उभारणीसाठी सुमारे ५००-५५० वर्षांचा संघर्ष करण्यात आला आहे. शेकडो रामभक्तांनी यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे मंदिर उभारणीचे काम झाले आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होणार, या दिवसाची तमाम रामभक्तांना प्रतीक्षा आहे. त्या दिवशी आपापल्या भागांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे, सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, खासगी आस्थापनांना अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणीही भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे