ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

जंतर-मंतरवर पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीनं मागितली माफी.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे जमलेल्या काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर वाद उद्भवला.

रुचिका सिंह नावाच्या मुलीचाही व्हिडीओ समोर आला होता, ज्यात तिने पंतप्रधान मोदींना अश्लील शिवीगाळ केल्याचे दिसत होते. या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तिचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा पहिल्यांदाच थेट उल्लेख केला. या आंदोलनात माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले. तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल कटुता नाही. ही खोडकर मुले आहेत. त्यांना सुधारणे आपल्याच हातात आहे, असे विधान त्यांनी या व्हिडीओत बोलताना केले.

रुचिका सिंहने काय म्हटले ?

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या रात्रीच्या व्हिडीओनंतर रुचिका सिंहच्या माफीचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ती म्हणाली, “मी माझ्या मित्रांबरोबर कनॉट प्लेसला गेली होती. तिथे आंदोलन करणारे काही लोक पंतप्रधान मोदींना खूप शिवीगाळ करत होते आणि ते इतरांनाही यासाठी उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी ते विधान केले होते. त्याबद्दल मी माफी मागते.”

मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे काही केले ते माफीच्या लायक नाही. मी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल. पुन्हा असे कधीही मी करणार नाही. तसेच हा व्हिडीओ मी पोस्ट केलेला नव्हता. मला इतकी लाज वाटत आहे की, मी स्वतःशीही नजर मिळवू शकत नाही. कृपया मला माफ करा.

FIR मध्ये २५ वर्षांचा उल्लेख

दरम्यान रुचिका सिंहच्या विरोधात नोएडामधील पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये रुचिका सिंहचे वय २५ असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. रुचिका सिंहच्या विधानांमुळे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला असून त्यामुळे अशांतता पसरू शकते, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

‘त्या मुलांना माफ करूया’ – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांनी ३१ जुलै रोजी रात्री आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ करुया, असे म्हटले. या भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा दाखविण्याचे काम आपलेच आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे