ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी

पुणे

आळेफाटा (ता‌.जुन्नर) येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळगाव जोगा कालव्याच्या कडेला असुन या ठिकाणी दररोज रात्री अज्ञात व्यक्ती कचरा टाकत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गर्धी सुटुन कचरा कुंडीचे स्वरूप आल्याचे दिसुन येत आहे.

आळेफाटा या ठिकाणी मोठी बाजारपेठ असुन येथील काही नागरीक रात्रीच्या वेळी कालव्याच्या कडेला तसेच कालव्यातही टाकत असुन ग्रामपंचायत हद्दीतील सगळा कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र यंत्रणा (घंटागाडीची)सोय असताना देखील या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने सगळीकडे कचराच दिसत आहे.

तसेच ज्या ठिकाणी हा कचरा साचत आहे त्याच्या काही फुटांच्या अंतरावर शिवछत्रपती विद्यालय व जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा असुन या शाळेत इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत असुन या कच-याचा ढीगा यामध्ये प्लॅस्टीक, शिळे अन्न कुजलेल्या अवस्थेत पडलेले असुन या ठिकाणी घाण वास येत असुन यांचा त्रास या ठिकाणी येत असलेल्या मुलांना होत असुन आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळा सुरू झाला असुन या शाळेत प्रवेश करत असताना विद्यार्थ्यांना दररोज नाकाला रूमाल लावुनच प्रवेश करावा लागतो आहे.

येथील ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी कचरा टाकू नये असा सुचनाफलक देखील कचरा टाकू नका असा लावलेला असताना देखील या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले दिसुन येत आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असुन पावसाचे पाणी या कच-यात साचत असल्याने हा कचरा सडु लागल्याने या परीसरात रोगराईचे प्रमाण वाढणार आहे.

तसेच जे नागरीक कचरा टाकत आहेत त्यांच्यावर ग्रामपंचायतीने कडक कारवाई करावी अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखाण्याचे संचालक सुरेश गडगे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे