ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात राहणार्‍या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने 3 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक

अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी परिसरात राहणार्‍या एका खासगी नोकरदाराची ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने 3 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी संबंधित व्यक्तीने शनिवारी (21 मार्च) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत. 8 मे 2024 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मेघा शर्मा नावाच्या महिलेचा फोन आला.

तिने शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दळवी यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. सदर ग्रुपमध्ये ट्रेडिंगविषयक मार्गदर्शन दिले जात असल्याने दळवी यांनी सुरूवातीला लहान रकमेची गुंतवणूक केली. अ‍ॅपवर नफा दिसू लागल्याने त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. काही दिवसांनी त्यांना दुसर्‍या ग्रुपमध्ये अ‍ॅड करून एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.

यानंतर आरोपींनी विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार दळवी यांनी जून ते जुलै 2024 दरम्यान वेगवेगळ्या तारखांना एकूण 3 लाख 50 हजार रूपये संबंधित खात्यांमध्ये जमा केले.

अ‍ॅपमध्ये नफा दिसत असला तरी प्रत्यक्षात पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता विड्रॉल होत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री त्यांना झाली.

या घटनेनंतर दळवी यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर 3 जुलै 2024 व 16 जुलै 2024 रोजी स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या. मात्र त्यांना फसवणुकीच्या रकमेबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.

त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात 21 मार्च 2026 रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे