ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

‘जलशक्ती अभियान – कॅच द रेन २०२६’पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार ?

अहिल्यानगर

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘जलशक्ती अभियान – कॅच द रेन २०२६’ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यासाठी १ लाख ५८ हजार ६५६ कृत्रिम भूजल पुनर्भरण संरचना उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

उद्भवलेल्या ‘अल निनो’ परिणामामुळे निर्माण होणारी संभाव्य दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मे २०२७ पर्यंत संपूर्ण राज्यात ३४ लाख ८३ हजार ९४० संरचना उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली विविध शासकीय विभागांना स्वतंत्र उद्दिष्टे देण्यात आली आहेत.

यामध्ये भूजल सर्वेक्षण, ग्रामविकास, कृषी, वन, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गाव तलाव पुनर्जीवन, सिमेंट नाला बंधारे, शेततळी आणि शाळा व सरकारी इमारतींवर ‘रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग’ व शोषखड्डे उभारून भूजल पातळी वाढवण्याचा मुख्य उद्देश आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे