ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

महात्मा फुले यांच्या पुतळा उभारणीला कोणी लावला ब्रेक ?

अहिल्यानगर

अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारच्या सभेत सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक निखील वारे व इतर सदस्यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरून अधिकाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

शहरातील माळीवाडा वेस पाडून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याच्या कामाला न्यायालयातून स्थगिती मिळाल्याने व प्रारूप आराखड्यात कायदेशीर अडथळे निर्माण झाल्याने सदस्यांनी न्यायालयीन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला.

पॅनलवरील वकिलांवर लाखो रुपये खर्च होऊनही उच्च न्यायालयात वेळेत ‘कॅव्हेट’ दाखल न केल्याने तसेच सभेला संबंधित विधी अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सभापतींनी विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

यासोबतच, वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी शहरातील चौकाचौकांत सीसीटीव्ही बसवणे, घंटागाडीच्या क्यूआर कोड प्रणालीतील संभाव्य घोटाळ्याची चौकशी करणे, पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि पाणी टँकरचालकांची अल्कोमीटर व वैद्यकीय तपासणी करणे आदी महत्त्वपूर्ण मागण्या या सभेत करण्यात आल्या.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे