ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

सक्षम निर्णय, सकारात्मक विचार व धाडसी कर्तव्य यशाची त्रिसूत्री -प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड

अहिल्यानगर

प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस मुख्यालय अहिल्या नगर येथे “आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव”! व्यक्तिमत्व विकास या विषयावर लेखक व प्रेरणादायी वकते श्री दत्तात्रय वारकड ,यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पी आय श्री उमेश परदेशी तसेच श्री भोसले विजय राखीव पोलीस उपनिरीक्षक व सर्व पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी आरसीएफ फोर्स, क्यू आर टी फोर्स मधील पोलीस कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये मानव आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याकरिता जोखमीची धडपड धावपळ करतो. या धावपळीच्या युगामध्ये सद्यस्थितीमध्ये अनेक प्रकारचे यंत्र आले तंत्र आले प्रगती झाली डिजिटल युग ए आय सोशल मीडिया यांचा वाढता प्रभावामुळे जीवन अत्यंत वेगवान झाले आहे. अशा या धावपळीच्या जीवनामध्ये मानव आपली स्वतःची मनशांती समाधान आनंद हे सर्व काही लोप पावत चाललेला आहे . अशा या यंत्र यावत जीवनामध्ये मानसिक सुख शांती समाधान आणि आनंद जीवन कसे जगावे यावर सविस्तर लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी सर्व उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.

धावपळीच्या युगामध्ये आनंदी जीवन ही संकल्पना कशी राबवली पाहिजे. याकरिता काही महत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या.

● समाजामध्येआपले कर्तव्य बजावत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व समाजाचे, देशाचे संरक्षण करण्याकरिता पोलीस आपले तन मन धन अर्पण करून सेवांमध्ये कार्यरत असतात अशावेळी साहजिकच मनाची चिडचिड होणे , स्वतः साठी व कुटुंबासाठी वेळ देणे सहज शक्य होत नाही अशा वेळी जीवनात ताण तणावाला ही सामोरे जावे लागते.

● कर्तव्य बजावत असताना अनेक जोखीम स्वीकाराव्या लागतात अशावेळी स्वतः वर संयम ठेवून शांत मनाने, सकारात्मक, आनंदी जीवन कसे जगावे, सुख, शांती जीवनात कसे प्राप्त करावे.

याकरिता अनेक संत, महंत, शूर, वीर, थोर समाज सुधारक यांच्या व्यक्ती चारित्र्याचा दाखला देत वक्ते श्री वारकड यांनीं सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याशी दिलखुलास पणाने संवाद साधला व ताण तणावातून आनंदी जीवन कसे जगावे याचा प्रत्यय सविस्तरपणे उपस्थित यांच्या समोर विषद केला.

सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या राष्ट्राच्या विकासामध्ये असलेल्या महान योगदानाबद्दल सर्व प्रथमतः वक्ते श्री वारकड यांनी उपस्थितांच्या महान कार्याला वंदन केलेव सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले.

सर्वांनी आपल्या या जोखमीच्या कार्यात व अत्यंत धावपळीच्या जीवन प्रणाली मध्ये 15 ते 20 मिनिटं नियमितपणे ध्यान करणे , सकारात्मक पुस्तकांचे वाचन करणे निसर्गाच्या सानिध्यात फिरणे, सकारात्मक विचारांचे चिंतन , मनन करणे , आनंदी मन ठेवण्याकरिता आवश्यक असणारे जीवनप्रणाली चे अवलोकन करण्या करिता विचार प्रक्रिया कशा पद्धतीने निर्माण केली पाहिजे.

जिवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा ठेवावा, याबाबत मार्गदर्शन केले. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं सकारात्मक पुस्तकांचे वाचन केल्याने आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. व हे वाचन मानवाला मोठे करते. जिवनामध्ये आज आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच आहोत असे स्पष्ट करण्यात आले.

विचार जीवनावर तर कल्पना जगावर राज्य करतात. अनेक संशोधकांनी जे काही शोध लावलेले आहेत. विमानाचा शोध लावण्यात आला, दूरध्वनीचा शोध लावण्यात आला, मोटार वाहनाचा शोध लावण्यात आला , असे अनेकविध जे काही शोध लावण्यात आले आहेत. या सर्वांचे सार विचारांमध्ये दडलेले आहे.

जीवनामध्ये सर्व खेळ हा सकारात्मक विचारांचा असतो आपण विचार कुठले करत आहोत. याचा विचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे म्हणून जीवनामध्ये नकारात्मक गोष्टींना थारा न देता सकारात्मक गोष्टीवरती जास्तीत जास्त ध्यान आकर्षित करून जीवनामध्ये यश मिळवण्याकरिता सकारात्मक विचारांचा अविष्कार आपण जीवनात अनुभवावा याचे महत्त्व विशद करत असताना संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरी मध्ये ध्यान योगाचे महत्त्व जे सांगण्यात आले आहे. याचे महत्त्व विशद करण्यात आले.

या बाह्य जग जगतापेक्षा कितीतरी विस्तीर्ण मोठे जग आपल्या अंतरात्म्यामध्ये दडलेले आहे परंतु आपण आपल्या अंतरात्म्यामध्ये झोकून बघत नाही त्याकरिता ध्यान प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे .

” विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेचि जाहले देह ब्रम्ह! ” संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ध्यान प्रक्रिया या उक्तीवर स्पष्टता करण्यात आली.

या प्रसंगी उपस्थितांना पंधरा ते वीस मिनिटं ध्यान करण्याचे आवाहन लेखक व प्रेरणादायी वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांनी केले.

राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री विजय भोसले यांनी वक्ते श्री दत्तात्रय वारकड यांचा यावेळी सन्मान केला. व उपस्थित कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आणि प्रेस रिपोर्टर यांचे सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे