ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धीरज परदेशी यांच्या झालेल्या मृत्यूनंतर वंचित बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करण्यात आला..

अहिल्यानगर

महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर दिनांक ७ ऑगस्ट रोजी काही ६-८ जणांनी जीवघेणा हल्ला केला. मुकुंदनगर परिसरात हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात परदेशी गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

धीरज परदेशी यांच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूनंतर अहिल्यानगर शहरात वातावरण तापले असतानाच, आता या प्रकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. १० ऑगस्ट रोजी अहिल्यानगरच्या डीएसपी चौक आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर झालेल्या आंदोलना दरम्यान काही वक्त्यांनी समाजात तणाव निर्माण करणारी आणि चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. याप्रकरणी संबंधित वक्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केली असून, याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.धीरज परदेशी यांच्या मृत्यूनंतर १० ऑगस्ट रोजी हे आंदोलन पार पडले होते.

मात्र, या आंदोलना दरम्यान व्यासपीठावरून बोलताना काही वक्त्यांनी कायदा-सुव्यवस्था, भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणारी भाषा वापरल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर, सामान्य नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही काही आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर एखादी सामान्य कमेंट किंवा पोस्ट केली तरी पोलीस तात्काळ कारवाई करतात. मग जाहीर व्यासपीठावरून आणि लोकप्रतिनिधींकडून कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी विधाने केली जात असतील, तर त्यांच्यावरही कायद्यानुसार समान कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे