ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिवशंकर मिञ मंडळ व चवंडके परिवार आयोजित हनुमान चालीसा पाठ व पठण भक्तिमय वातावरणात संपन्न

अहिल्यानगर

शिवशंकर मिञ मंडळ व चवंडके परिवार आयोजित हनुमान चालीसा पाठ व पठण भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.

रंगार गल्ली येथील शिवशंकर मिञ मंडळ व चवंडके परिवार यांच्या तर्फे श्री हनुमान चालीसा पाठ व पठण भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री राम भक्त हनुमान सत्संग मंडळ( ट्रस्ट ) नवीपेठ यांचे भजन संध्या कार्यक्रमात अवतरले.

बाल हनुमान दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही मोठ्या उत्साहात कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले ,बाल हनुमान व भक्तिमय वातावरणात सर्व परिसर दंग झाले होते. लहानांपासून मोठ्यांनी सुध्दा या कार्यक्रमाचा आनंद लुटला.

या कार्यक्रमात स्थानिक नगरसेवक मिञ परिवार शिवशंकर मिञ मंडळाचे सर्व कार्यकर्ते व चवंडके परिवार व सर्व भक्त गण मोठ्या संख्येत उपस्थित होते. आकर्षक लायटिंग यललेडी लावण्यात आले होते.जेणेकरुन लांब बसणाऱ्या भक्तांना सर्व कार्यक्रमाचा आनंद घेता यावा.

स्वर संगीत वाद्य आकर्षण गाण्यानी परिसरात दंग होऊन गेला होता.कार्यक्रमाची सांगता महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे