ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कोर्टाच्या तारखा आता पुढे ढकलता येणार नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई

‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’,असे म्हणतात. याचे कारण म्हणजे वर्षानुवर्षे चालणारे खटले, कोर्टाच्या तारखांमुळे लोक हैराण होतात. पण यापुढे हे चित्र बदलणार आहे. सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीख’ला आळा घालण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

सुप्रीम कोर्टाचे परिपत्रक जाहीर

1) सुप्रीम कोर्टाने बुधवारी याबाबतचे एक परिपत्रक जाहीर केले आहे. एखाद्या प्रकरणाची सुनावणी टाळण्यासाठी किंवा पुढे ढकलण्याबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत.

2) नव्या किंवा नियमित प्रकरणांमध्ये सातत्याने तारखा घेण्याला आळा बसणार आहे. केवळ अपरिहार्य परिस्थितीतच सुनावणी टाळली जाऊ शकते, असे कडक नियम तयार करण्यात आले आहेत.

काय आहेत नवे नियम?

➡️ विनाकारण सुनावणी पुढे ढकलता येणार नाही.

➡️ केवळ अपरिहार्य कारणांवरच पुढील तारीख मिळणार.

➡️ दुसऱ्या पक्षाला आधीच माहिती देणे अनिवार्य.

➡️ एकाच प्रकरणात वारंवार तारखा घेण्याला आळा.

➡️ नव्या प्रकरणात सुरुवातीला फक्त एकदाच पुढील तारीख.

प्रक्रिया देखील झाली कडक

1) एक दिवस आधी सकाळी ११ पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे.

2) दुसऱ्या पक्षाला आक्षेप घेण्याची संधी असणार आहे.

3) ठोस कारण आणि मागील तारखांची माहिती आवश्यक द्यावी लागणार.

4) दुसऱ्या पक्षाला सुनावणी पुढे ढकलण्याच्या नोटिशीवर आक्षेप घेण्याची संधी..

5) दुपारी १२ वाजेपर्यंत ईमेलद्वारे आक्षेप घेता येऊ शकतो.

केव्हा मिळेल पुढची तारीख?

कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू, गंभीर आजार किंवा इतर ठोस कारणे, जे कोर्टासमोर टिकू शकेल, अशा परिस्थितीच पुढची तारीख दिली जाईल.

यामुळे काय बदलणार?

1) खटल्यांचा विलंब कमी होणार

2) नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार

3) न्यायप्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होणार

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे