ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

स्वातंत्र्याचा अभिमान… तिरंग्याचा सन्मान..

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात पार पडला. महानगरपालिका मुख्यालयात आयोजित समारंभात महापौर सौ.ज्योती गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मा.आयुक्त यशवंत डांगे, मा.अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर,मा.उपायुक्त मेहेर लहारे, महिला व बालकल्याण उपसभापती सौ.वर्षा सानप यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जुने कार्यालय येथे उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रभाग समिती अधिकारी, कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाचा राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री. शंकर उत्तम मिसाळ यांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ, समर्पित व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल भारताच्या मा. राष्ट्रपती यांच्या वतीने जाहीर झालेल्या “गुणवत्तापूर्ण सेवा” (Medal for Meritorious Service) या प्रतिष्ठेच्या पदकाबद्दल गौरविण्यात आले. महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या १५ शौर्य व सेवा पदकांमध्ये श्री. मिसाळ यांच्या नावाचा समावेश होणे ही अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी अभिमानाची बाब असून, यानिमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या या राष्ट्रीय पर्वानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत नागरिकांना प्रभावी, पारदर्शक आणि निरंतर नागरी सेवा देण्याचा संकल्प अधिक दृढ करण्यात आला. शहराच्या विकासासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक हितासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

तिरंगा उंच राहो… राष्ट्रसेवेचा संकल्प निरंतर राहो..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे