ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

बालक मंदिर महिला मंडळात उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा

आपल्या प्रत्येक कामातून देशभक्तीची कृती दिसून आली पाहिजे असे गौरवउदगार लायन्स क्लबचे सेक्रेटरी माननीय श्री सनी वधवा यांनी मनोगतातून विचार व्यक्त केले .बालक मंदिर महिला मंडळ शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा झाला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा मा .सौ ज्योतीताई केसकर होत्या .लायन्स क्लबचे अध्यक्ष मा .श्री अक्षत झालानी सेक्रेटरी मा .श्री सनी वधवा तसेच खजिनदार मा श्री अभिजीत भळगट यांची सन्माननीय उपस्थिती होती .

ध्वजारोहण पाहुण्यांच्या हस्ते झाले .संपूर्ण वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .भारतमाता पूजन उपस्थितांनी केले .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी प्रास्ताविकातून विचार व्यक्त केले की हुतात्म्यांच्या बलिदानामुळे गुलामगिरी नष्ट होऊन भारत स्वतंत्र होऊन आज 80 वर्ष पूर्ण झालेत .

लहान वयापासूनच साक्षरते बरोबरच नैतिक विकास, मूल्यशिक्षण ,पर्यावरण जागृती, भारतीयांबद्दलची आपुलकी,अर्थ व संगणक साक्षरता या सर्व गोष्टींचा विकास झाला तरच भारत विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनेल.हे राष्ट्र देवतांचे या गीतावर मुलांनी कवायत सादर केली तसेच मुलींनी वंदे मातरम या गीतावर कवायत संचलन केले.

इयत्ता पहिली ते तिसरीच्या बाल कलाकारांनी देशप्रेम कशाकशातून व्यक्त होते यावर उत्कृष्ट पथनाट्याचे सादरीकरण केले .

भारतम भारतम, तसेच ध्वज उंच तिरंगा डोले या दोन्ही समूहगीतांचे उत्कृष्ट सादरीकरण झाले .त्यानंतर स्वराज टकले, युवराज मारवाडे, स्तुती गायकवाड, प्रांजल गायकवाड, हर्षदा माडीकर,भाग्यश्री सोनवणे ,अनन्या वाघमारे,कीर्ती वड्डेपेली ,कृष्णा सरडे, नचिकेत प्रजापती ,कृष्णा देवरे, जोया सय्यद ,अक्षय चव्हाण या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,इंग्लिश भाषेतून आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ ज्योती केसकर यांनी राष्ट्रप्रेमाचे धडे या बालवयापासून मिळाल्यास निश्चितच प्रगती होईल अशी ग्वाही दिली .या कार्यक्रमासाठी महिला मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ.सौ. विद्या होळेहोन्नूर ,खजिनदार सौ मेधा धोपावकर सदस्या सौ रोहिणी पुंडलिक या आवर्जून उपस्थित होत्या .पालक वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता .

कार्यक्रमात पाहुण्यांची ओळख निरुपमा देशपांडे , सूत्रसंचालन वैशाली सातपुते, विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे संयोजन सीमा कवाष्ठे,आभार प्रदर्शन ठकू पवार यांनी केले.

उत्कृष्ट फलक लेखन, रांगोळी, सजावट यासाठी अश्विनी मेंद्रे, सुकन्या बोली, हेमांगी भिडे ,उज्वला क्यादर, बेबी ढोणे या सर्वांनी परिश्रम घेतले .

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे