ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा बँकेच्या जेवणावळीवर ‘एफडीए’ची कारवाई..

जिल्हा सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सुमारे दोन हजार जणांच्या भोजनाची व्यवस्था करणार्‍या शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील सावता केटरर्सकडे अन्न व्यवसायाचा परवाना नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत समोर आले आहे.

विशेष म्हणजे, सणासुदीच्या दिवसांत एफडीएच्या पोर्टलवर कोणतीही नोंद न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था करण्यात आल्याचेही निदर्शनास आले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने संबंधित केटरर्सला नोटीस बजावून अन्न व्यवसायाचा परवाना प्राप्त होईपर्यंत आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत..

जिल्हा सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा सोमवारी (28 सप्टेंबर) आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी येणार्‍या उपस्थितांच्या भोजनाची व्यवस्था केशर गुलाब मंगल कार्यालय, आनंदधाम रोड येथे करण्यात आली होती. या भोजन व्यवस्थेचा ठेका शेंडी येथील सावता केटरर्सला देण्यात आला होता. सुमारे दोन हजार लोकांसाठी भोजन तयार करण्याचे काम संबंधित केटरर्सकडून करण्यात येत होते.

दरम्यान, सावता केटरर्सकडे अन्न व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गौरव जगताप यांना मिळाली. तसेच, सणासुदीच्या काळात एफडीए पोर्टलवर कोणतीही नोंद न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात भोजनाची व्यवस्था केल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली.

त्यानंतर सहायक आयुक्त जगताप यांनी अन्न सुरक्षा अधिकारी साजिदा मुल्ला यांच्यासह संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे