राज्यातील या दोन जिल्ह्यात दिवाळी सुटयांच्या तारखा जाहीर

या आदेशानुसार विद्यार्थ्यांना दिवाळीच्या २० दिवसांची सुट्टी मिळणार असून, शाळा पुन्हा सुरू होण्याची तारीखही स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी खालील वेळापत्रकाची नोंद करून ठेवणे आवश्यक आहे.
दिवाळी सुट्टी कधीपासून कधीपर्यंत?
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातील संबंधित शाळांना दि. ५ नोव्हेंबर २०२६ ते दि. २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यंदा दिवाळी सुट्टी एकूण २० दिवसांची असणार आहे. यानंतर दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शाळा पूर्ववत सुरू होतील.
दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक
| विषय | तारीख |
|---|---|
| दिवाळी सुट्टी सुरू | ५ नोव्हेंबर २०२६ |
| दिवाळी सुट्टी समाप्त | २४ नोव्हेंबर २०२६ |
| सुट्टीचा कालावधी | २० दिवस |
| शाळा पुन्हा सुरू | २५ नोव्हेंबर २०२६ |
कोणत्या शाळांना लागू?
हे आदेश लातूर जिल्ह्यातील संबंधित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना लागू आहेत. यामध्ये विविध व्यवस्थापनांच्या तसेच विविध माध्यमांच्या शाळांचा समावेश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे संबंधित शाळांनी दिवाळी सुट्टीचे नियोजन व शाळा सुरू करण्याची कार्यवाही या वेळापत्रकानुसार करणे अपेक्षित आहे.
प्रयोगशाळा सहायक व प्रयोगशाळा परिचर यांना सोडून शिक्षकेतर कर्मचा-यांना दिर्घ सुट्टया अनुजेय नाहीत. मात्र दिर्घ सुट्टीच्या कालावधीत ज्या सार्वजनिक सुट्टया असतील त्या सुट्टया शिक्षकेतर कर्मचा-याला अनुज्ञेय राहतील.
दिर्घ सुट्टी कालावधीमध्ये खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापनाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये व शिक्षकेतर कर्मचा-यानी मुख्याध्यापकांच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये.




