ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रोजगारासाठी कौशल्यांसोबतच जिद्द आणि आत्मविश्वास गरजेचा..मा.आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे..

कोपरगाव

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ..

कोपरगाव मधील विकसित देशांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. त्या संधी मिळवण्यासाठी युवक-युवतींनी शिक्षणासोबत उद्योगविश्वाला आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच जिद्द व आत्मविश्वासही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

युवतींनो, परिस्थितीसमोर हताश होऊ नका, रडत बसण्यापेक्षा लढत रहा. कायम डोळ्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.

संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ‘सेवासंकल्प’ अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी सौ. कोल्हे बोलत होत्या. यावेळी कोपगांवच्या नायब तहसिलदार प्रफुल्लिता सातपुते, प्राचार्य ए. आर. मिरीकर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डाॅ. आर. एस. शेंडगे व्यासपीठावर उपस्थित होते.

तसेच या महाकुंभाचे समन्वयक श्री अमोल घोलप, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, मुलाखती देण्यासाठी आलेले युवक युवती मोठ्या संख्येने हजर होते. तत्पूर्वी, मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंडित दीनदयाल उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ या राज्यस्तरीय उपक्रमाचे उद्घाटनाचे प्रक्षेपण सर्व उपस्थितांना दुरद्रुश्य प्रणालीवर दाखविण्यात आले.

याप्रसंगी सौ.स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, दिवसेंदिवस रोजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभासारखे उपक्रम काळाची गरज आहेत. ‘सेवासंकल्प’ अभियानाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी युवकांपर्यंत पोहोचत आहेत, ही सकारात्मक बाब आहे.

रोजगार महाकुंभ हा केवळ नोकरी देण्याचा उपक्रम नसून युवकांच्या कौशल्यांना योग्य संधीशी जोडण्याचा प्रयत्न आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सुविधा आणि रोजगाराच्या संधी पोहोचल्या पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे, या उद्देशाने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दुरदृष्टीतेची कार्यवाही संजीवनीसह संपुर्ण कोल्हे परीवार करत ओह. आज संजीवनीचे अनेक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.

संजीवनीच्या अनेक विद्यार्थ्यांनी रशिया, जपानसह विविध देशांमध्ये कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यांना योग्य कौशल्य, संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर ते देश-विदेशात आपले स्थान निर्माण करू शकतात. शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराची सांगड घातल्यास युवकांच्या सामथ्र्याला योग्य दिशा मिळेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे कोल्हे यांनी शेवटी नमूद केले.

दरम्यान, कोपरगाव येथील रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रातील १५ कंपन्यांनी सहभाग घेतला. सुमारे ५०० युवक युवतींनी नाव नोंदणी केली होती.आभार प्राचार्य मिरीकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. आय. के. सय्यद यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे