डिजिटल अरेस्ट च्या फसवणुकीपासून ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सावध राहावे – एसपी सुदर्शन

अहिल्यानगर आगामी सणासुदीच्या काळात ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट आणि ऑनलाइन खरेदीमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात आज पासून संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात सायबर सुरक्षितता’ अभियान राबविण्यात येणार आहे.
संपूर्ण महिनाभर नागरिकांना सायबर गुन्हे आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी विविध उपाययोजना तसेच व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदी व डिजिटल व्यवहार वाढतात. याच संधीचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांकडून आकर्षक ऑफर, बनावट वेबसाइट, फेक कस्टमर केअर, संशयास्पद लिंक, जढझ, णझख तसेच गिफ्ट व्हाउचर, कॅशबॅक आणि बक्षिसांचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करणे किंवा संशयास्पद संदेशांना प्रतिसाद देणे टाळावे.
ऑनलाइन खरेदी करताना संबंधित ई-कॉमर्स कंपनी किंवा वेबसाइट अधिकृत असल्याची खातरजमा करावी. अवास्तव सवलत किंवा अत्यल्प किमतीत वस्तू मिळण्याचे आमिष दाखविणाऱ्या लिंकपासून सावध राहावे. सोशल मीडिया, SMS, Whatspp किंवा ई-मेलद्वारे आलेल्या संशयास्पद लिंकवरून कोणतेही पेमेंट करू नये.
ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर डिलिव्हरी, कस्टम ड्युटी किंवा अन्य कारण सांगून अतिरिक्त पैसे मागितल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत माध्यमातून त्याची पडताळणी करावी. OTP, UPI PIN, TM/डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक, उतत, इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड किंवा अन्य गोपनीय आर्थिक माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये.
डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणुकीचा धोका
सायबर गुन्हेगार पोलीस, CBI, ED, कस्टम, न्यायालय किंवा अन्य सरकारी यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना फोन किंवा व्हिडिओ कॉल करू शकतात. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्याचे, त्याच्या नावाने पार्सलमध्ये अमली पदार्थ किंवा बेकायदेशीर वस्तू आढळल्याचे किंवा बँक खाते मनी लॉन्डरिंगसाठी वापरले जात असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट’ केल्याचा बनाव केला जाऊ शकतो.
अशा वेळी घाबरून जाऊन कोणतेही पैसे पाठवू नयेत. पोलीस किंवा कोणतीही सरकारी यंत्रणा व्हिडिओ कॉलवर नागरिकाला डिजिटल अरेस्ट’ करून तातडीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत नाही. त्यामुळे असा कॉल आल्यास तो फसवणुकीचा प्रयत्न…
फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा..
सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाबरून न जाता १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइनवर तातडीने संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
तांत्रिक मदत किंवा खाते पडताळणीच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांकडून मोबाईलमध्ये स्क्रीन-शेअरिंग किंवा रिमोट अॅक्सेस प डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. अशा अनोळखी एॅप्सना परवानगी देऊ नये. विशेषतः बँकिंग व्यवहार सुरू असताना स्क्रीन शेअर करू नये आणि अनोळखी व्यक्तीला मोबाईलचा ताबा देऊ नये.
SIM बंद होणार’ KYC अपडेट करा’ बँक खाते गोठवले जाईल’ अशा संदेशांमधील लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. मोबाईल क्रमांक, आधार, PN, बँक खाते किंवा कार्डची माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये. बँक खात्यातील व्यवहारांचे SMS किंवा प अलर्ट नियमितपणे तपासावेत.
मोबाईलचे ऑपरेटिंग सिस्टिम आणि आवश्यक प्स अद्ययावत ठेवावेत. अनोळखी प्स डाउनलोड करू नयेत तसेच त्यांना अनावश्यक परवानग्या देऊ नयेत. सार्वजनिक Wi-Fi वापरून संवेदनशील आर्थिक व्यवहार करणे शक्यतो टाळावे. सोशल मीडिया खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि उपलब्ध असल्यास दोन स्तरीय सरक्षा वापरावी.
कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख स्वतंत्रपणे पडताळून पाहावी आणि गरज असल्यास थेट जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
फसवणुकीनंतर विलंब न करता तक्रार करणे महत्त्वाचे आहे. व्यवहाराची तारीख, वेळ, रक्कम, UTR/Transaction ID, मोबाईल क्रमांक, स्क्रीनशॉट, संशयास्पद लिंक, ई-मेल किंवा Whatspp संदेश यांसारखे उपलब्ध पुरावे जतन करावेत.
संशयित व्यक्तीशी पुढील कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. घाई करू नका, घाबरू नका, पडताळणी केल्याशिवाय पैसे देऊ नका’ हा सायबर सुरक्षेचा मूलमंत्र नागरिकांनी लक्षात ठेवावा. स्वतःबरोबरच कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि डिजिटल व्यवहाराची कमी माहिती असलेल्या व्यक्तींनाही सायबर फसवणुकीच्या पद्धतींबाबत जागरूक करावे.
सण आनंदाने आणि सुरक्षितपणे साजरे करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने डिजिटल व्यवहारात आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.
QR कोड, UPI आणि बनावट कस्टमर केअरपासून सावध..
पैसे मिळण्यासाठी QR कोड स्कॅन करावा किंवा UPI PIN टाकावा लागतो, असा गैरसमज निर्माण करूनही फसवणूक केली जाते. पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करणे किंवा UPI PIN टाकणे आवश्यक नसते.
कोणताही व्यवहार करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव आणि रक्कम तपासावी. बँक, विमा कंपनी, कुरिअर, ई-कॉमर्स कंपनी किंवा अन्य सेवांचा कस्टमर केअर क्रमांक शोधताना अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत पचा वापर करावा. इंटरनेटवर सापडलेल्या अनोळखी क्रमांकावर संपर्क करून आर्थिक अथवा वैयक्तिक माहिती देऊ नये.
जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी..
ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून डिजिटल अरेस्ट’सह विविध प्रकारच्या सायबर फसवणुका केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कुटुंबीयांनी ज्येष्ठ नागरिकांना अशा फसवणुकीच्या पद्धतींबाबत माहिती द्यावी. अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आल्यास तो कट करावा, संबंधित पोलीस ठाणे किंवा संस्थेच्या अधिकृत क्रमांकावर स्वतःहून संपर्क साधावा आणि कुटुंबातील विश्वासू व्यक्तीशी तातडीने चर्चा करावी. तुमचे खाते बंद होणार आहे. KYC अपडेट करा’ तुमच्या नावावर गुन्हा दाखल आहे. तुमच्या नावाने पार्सल सापडले आहे. तुम्हाला अटक होणार आहे, किंवा पैसे सुरक्षित खात्यात ट्रान्सफर करा’ अशा धमकीवजा संदेशांवर विश्वास ठेवू नये.




