ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

छ. संभाजीनगरला सलगच्या सुट्यांमुळे वेरुळ हाऊसफुल..

१६ ऑगस्ट सलगच्या सुट्यांचा योग आल्याने सकाळपासूनच जगप्रसिद्ध वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि वेरुळ लेणी परिसरात भाविक-पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली.

भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, संपूर्ण परिसराला जणू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे

स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि त्यानंतरची रविवारची सुटी यामुळे विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक वेरुळमध्ये दाखल झाले. सकाळपासूनच घृष्णेश्वर मंदिराकडे भाविकांचा ओघ सुरू होता. दर्शनासाठीच्या रांगा मंदिर परिसरापासून दूरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहण्यासाठीही पर्यटकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे मंदिर परिसरासह लेणी परिसर दिवसभर गजबजून गेला. रस्त्यांवर आणि परिसरात वाहनांची वर्दळ वाढल्याने वेरुळमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सलगच्या सुट्यांमुळे रविवारी सकाळपासूनच भाविक-पर्यटकांचा ओघ सुरू राहिल्याने घृष्णेश्वर मंदिर आणि वेरुळ लेणी परिसर गर्दीने फुलून गेला असून, संपूर्ण वेरुळला यात्रेचे स्वरूप आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे