ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

साहित्य संपदातर्फे मराठी भाषा पंधरवड्या निमित्त विश्वविक्रमी कथा वाचन महोत्सवाचे यशस्वी आयोजन  

मुंबई

विश्वविक्रमी ऑनलाईन काव्यवाचन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनानंतर मराठी भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांच्या संकल्पनेतून साहित्यसंपदा आयोजित ‘गोष्टी तुमच्या आमच्या’ ऑनलाईन कथावाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .

दिनांक 24-1-26 ते 26-1-26 या काळात फेसबुक लाईव्ह पार पडलेल्या कथा वाचन सोहळ्यात महाराष्ट्रातीलच नव्हे तर बेंगलोर,कतार,सिंगापूर,अमेरिका येथील विविध भागांतून,स्तरांतून कथाकारांनी यशस्वी सहभाग नोंदविला.

तीन दिवस चाललेल्या या कथावाचन सोहळ्यात अनेक नामवंत कथाकार आणि महाराष्ट्रातील विविध ७ शाळा सहभागी झाल्या होत्या.

ऑनलाईन सांगता समारंभास राजन लाखे (बकुळगंधकार) जेष्ठ साहित्यिक ,अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांनी उपक्रमाचे कौतुक करताना वाचन चळवळीचे महत्व उदाहरणासहित उलगडून दाखविले. डॉ.सोनाली लोहार स्तंभ लेखिका ,कथाकार ,व्हॉइस थेरपिस्ट यांनी शाळेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना वाचन संस्कृतीची बीजे मुलांच्या मनात रुजविणे गरजेचे आहे अशी भावना व्यक्त केली.

एकनाथ आव्हाड सुप्रसिद्ध बालसाहित्यिक साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्राप्त यांनी उपक्रमाचे कौतुक करताना कथावाचन महोत्सवातील सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.

डायमंड बुक ऑफ रेकॉर्डस् तर्फे समन्वयक डॉ.योगेश जोशी यांनी सदर कथा वाचन महोत्सवाची नोंद विश्वविक्रम म्हणून झाल्याची घोषणा करताच मराठी कथांची दखल जागतिक पातळीवर घेतल्याचा आनंद सगळ्यांच्या मनात ओसंडून वाहत होता.

कार्यकारणी सदस्य अपेक्षा बिडकर, सलोनी बोरकर, वैशाली कदम , अर्चना गोरे , मानसी नेवगी, किसन पेडणेकर, स्मिता पेशवे, लालसिंग वैराट, स्मिता हर्डीकर, मंजुळ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विश्व् विक्रमी कामगिरी करताना आलेल्या अनुभवांचे कथन केले.

या कथावाचन महोत्सवाचे वैशिष्टय म्हणजे शुभंकरोति साहित्य मंच,मुंबई,साहित्यिक सखी ग्रुप,उदगीर,अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान, कल्याण,शब्दशिल्प कलाविष्कार संघ, मुंबई,अभिनव फाउंडेशन,भडगाव या महाराष्ट्रातील विविध भागांतील संस्थांनी यात सहभाग नोंदविला.डिजिटल पार्टनर मनोमय मीडिया यांनी काम पाहिले.

सदर सांगता सोहळ्यास अश्विनी निवर्गी यांनी आपल्या साहित्यिक सखी उदगीर संस्थेची ओळख करून देताना गृहिणींनी नवीन टेक्नॉलॉजीचे आव्हान लीलया पेलले असे म्हणून सर्व महिला कथाकारांचे अभिनंदन केले.

सोनाली जगताप यांनी शुभंकरोति साहित्य मंच आगामी उपक्रमांत देखील सहभागी राहून मराठी भाषेसाठी कार्य करीत राहील असे आश्वासन दिले आणि उपक्रमास विशेष मदत लाभलेल्या अजित महाडकर,गीतांजली वाणी,मयूर पालकर,माया यावलकर यांचे आभार मानले.

या कथावाचन सोहळ्याचे संकल्पनाकार वैभव धनावडे यांनी सर्व मान्यवरांचे ,सहभागी संस्था,शाळा आणि सहभागी वाचकांचे आभार मानताना मराठी भाषेच्या सेवेसाठी सातत्याने नवं नवीन प्रयोग राबविण्याची ग्वाही दिली.

मराठी भाषा पंधरवड्याची सांगता विश्वविक्रमी सोहळ्याने झाल्याने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले.शासनाने अश्या उपर्कांची दखल घेऊन कौतुकाची थाप सदर संस्थांना द्यावी अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे