ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर

IMD मागील अनेक दिवासांपासून मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी होती. आता मात्र थंडीचा कडाका कमी होत आहे. मात्र आता थंडीनंतर अचानक राज्यभरातील अनेक भागात पावासाच्या सरींनी हजेरी लावली. मुंबईसह रायगडमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम राज्याच्या काही भागांवर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात ढगाळ हवामान असेल. मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 27 जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होईल, परंतु दिवसा तापमानात वाढ आणि उष्ण हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातही दिवसभर ढगाळ हवामान असेल. उत्तर महाराष्ट्रात हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर भागातही ढगाळ वातावरण असेल. 27 आणि 28 जानेवारी रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे