ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तोतया डिवायएसपीकडून 33 लाखांची फसवणूक. दोन पोलीस कर्मचार्‍यांची फसवणूक

अहिल्यानगर

स्वतःला निलंबित पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस कर्मचार्‍यांची 33 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे.

या प्रकरणी गजानन सखाराम बोडखे (वय 36 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाम अजिनाथ साळुंखे व त्याचा भाऊ आकाश साळुंखे (रा. केडगाव) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बोडखे आणि त्यांचे सहकारी विशाल प्रभाकर पायघन (रा. केडगाव) हे अहिल्यानगर रेल्वे सुरक्षा बल येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शाम साळुंखेशी परिचय झाला. त्याने स्वत: डीवायएसपी असल्याचे व काही कारणास्तव निलंबित असल्याचे सांगून सध्या प्लॉटींगचा व्यवसाय करत असल्याचे भासविले. त्याने बोडखे व पायघन यांना गुंतवणुकीची ऑफर दिली. भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणार्‍या जागेवरील दोन प्लॉटसाठी प्रत्येकी 20 लाख रूपये गुंठ्याप्रमाणे एकूण 40 लाख रूपये लागतील, असे आमिष त्याने दाखवले.

त्यावर विश्वास ठेवून दोन्ही पोलिसांनी बँक ऑफ इंडियाच्या लातूर शाखेतील शाम साळुंखे याच्या बँक खात्यावर आरटीजीएसव्दारे टप्प्याटप्प्याने एकूण 40 लाख रूपये वर्ग केले.

यासाठी त्यांनी बँकेतून मोठे कर्जही काढले.दरम्यान पैसे घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्याने आणि नंतर विचारणा केली असता, केवळ वेळकाढूपणा केल्याने फसवणूक झाल्याचे बोडखे व पायघन यांच्या लक्षात आले. साळुंखे याने काही दिवसांनी 7 लाख रूपये परत केले, परंतु उर्वरित 33 लाख रूपये देण्यास टाळाटाळ केली.

या प्रकारानंतर, आपल्याला प्लॉट न देता विश्वासघात करून फसवणूक करण्यात आल्याची खात्री झाल्यावर बोडखे व पायघन यांनी पोलिसांत धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात शाम साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाम साळुंखे हा डिवायएसपी नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे