ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर महानगरपालिकेकडून मालमत्ता कराचे यापूर्वी निश्चित केलेले दर कायम – आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर

ज्यांच्या बांधकामात, मालमत्तेत बदल झालाय त्यांनाच करयोग्य मूल्याच्या नोटीसा..

अहिल्यानगर शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षणानंतर ज्यांच्या मालमत्तेत बदल झाला आहे, बांधकामाचे क्षेत्रफळ वाढले आहे, अथवा ज्यांना कर आकारणी होत नव्हती व आता नव्याने कर आकारणी करायची आहे, केवळ अशाच मालमत्ताधारकांना मोजमापे घेऊन करयोग्य मूल्याच्या नोटीसा महानगरपालिकेकडून बजावण्यात आल्या आहेत. या नोटीसा मालमत्ता कराच्या नाहीत. तसेच, सरसकट सर्वांना या नोटीसा दिलेल्या नाहीत. मालमत्ता कराचे यापूर्वी निश्चित केलेले दर कायम आहेत, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

सर्वेक्षणामध्ये नव्याने झालेली बांधकामे, जुन्या बांधकामातील बदल व त्यानुसार वाढलेले अथवा घटलेले क्षेत्रफळ, भाडेकरू व दुरुस्ती झालेली बांधकामे, तसेच ज्यांना घरपट्टीच आकारली नव्हती, अशा मालमत्ता सर्वेक्षणात घेण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून सन २००३ ते २०२५ या मागील २२ वर्षात कधीही फेरमूल्यांकन झालेले नाही. प्रत्येक ५ वर्षांनी फेरमूल्यांकन व नवीन दरवाढ महानगरपालिका अधिनियमानुसार अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ही कार्यवाही यापूर्वी गेल्या २२ वर्षात झाली नाही. महानगरपालिकेकडील मालमत्तांच्या नोंदी या २२ वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे नव्याने मोजमापे घेऊन जुन्याच दराने नवीन मोजमापानुसार त्या मालमत्तेला कर आकारणी होणार आहे.

गेल्या २२ वर्षात महानगरपालिकेच्या सोयी सुविधांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणी योजना व इतर लाईट बिल सुमारे ३० ते ४० कोटी रुपये, कर्मचाऱ्यांचे पगार सुमारे ११० कोटी रुपये, शहरातील विविध कामे असा वर्षासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील रस्ते प्रकल्पासाठी सुमारे ४५ कोटींचा सुवाहिस्सा, पीएम ई बस सेवेसाठी सुमारे ४ कोटींचा स्वहिस्सा, महापालिकेच्या नव्याने उभे राहत असलेल्या जिजामाता रुग्णालयासाठी १० कोटींचा स्वहिस्सा, यासह सारसनगर, सावेडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नेहरू मार्केट, सर्जेपुरा रंगभवन, प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुल, सावेडी नाट्यसंकुल आदींच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करावा लागणार आहे.

त्या तुलनेने उत्पन्नात वाढ नसल्याने आर्थिक अडचणी वाढून सुविधांवर व प्रकल्पांवर परिणाम होत आहे. त्यासाठीच कोणतीही दर वाढ न करता केवळ नव्याने मोजमापे घेऊन फेरमूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

उदाहरण स्पष्टीकरण..मा. यशवंत फुलसुंदर यांचे

पूर्वीचे क्षेत्रफळ : ३०.२४ चौ.मी.

वाढीव बांधकामासह सध्याचे क्षेत्रफळ : १४१.९२ चौ.मी.

पूर्वीचे करयोग्य मूल्य : ₹३,०२४

सध्याचे करयोग्य मूल्य : ₹१०,१२४

सर्वसाधारणपणे या करयोग्य मूल्याच्या सुमारे २७% इतकी घरपट्टी आकारली जाते.ज्यांचे अतिरिक्त बांधकाम / क्षेत्रफळ वाढ झाली आहे.केवळ त्यांच्याच करयोग्य मूल्यात वाढ होणार. सरसकट कोणाचीही करवाढ नाही.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे