ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात महापालिकेत अंतर्गत रस्त्यांची कामे..आयुक्तांनी दिले हे आदेश

अहिल्यानगर- परीक्षा काळात विद्यार्थी, पालकांना रस्त्यांच्या कामांमुळे अडचणी येणार नाही अशा उपाययोजना कराव्यात..

परीक्षेपूर्वी शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित कामे करून घेण्याचे आयुक्त यशवंत डांगे यांचे आदेश

बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी..

महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यात प्रमुख रस्त्यांवर असलेल्या महाविद्याय व शाळांच्या परिसरात कामे सुरू आहेत. पुढील आठवड्यात दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा काळात रस्त्यांच्या कामामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक, शाळांच्या कर्मचाऱ्यांना त्रास होऊ नये, या दृष्टीने तत्काळ रस्त्याच्या कामांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी बैठक घेऊन बांधकाम विभागाला दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्यांची पाहणी केली.

लवकरच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे सारडा कॉलेज, न्युआर्ट्स कॉलेज, रेसिडेन्शियल हायस्कूल, फिरोदिया हायस्कूल, केडगाव येथील अंबिका विद्यालय आदी भागात सुरु असलेल्या व सुरू होणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा आयुक्त यशवंत डांगे यांनी घेतला. पत्रकार चौकापासून ते दिल्लीगेट रस्त्याचे काम सुरू आहे. या मार्गावर सारडा, न्यू आर्टस्, रेसिडेन्शियल कॉलेज आहेत. लालटाकी येथे शाळा आहे. तसेच, वाडिया पार्क संकुलासमोर फिरोदिया संस्थेच्या तीन शाळा व इतर शाळा आहेत. तेथील कामांना गती देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. काम तत्काळ पूर्ण होणार नसले, तरी परीक्षा काळात शाळेत अथवा महाविद्यालयात येण्याजाण्यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना अडचणी येणार नाहीत, या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. बांधकाम विभागासह पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी व शाळा, कॉलेज परिसरात प्रलंबित असलेली कामे करून घ्यावीत, अशा सूचना आयुक्त यशवंत डांगे यांनी दिल्या.

शहरासह केडगाव येथे अंबिका विद्यालय परिसरात रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्या ठिकाणीही समक्ष पाहणी करून शाळेत जाण्यासाठी अडथळे होणार नाहीत, यादृष्टीने नियोजन करून काम सुरू करावे, असे त्यांनी सांगितले. आयुक्त यशवंत डांगे यांनी सूचना देताच बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ समक्ष पाहणी केली व ठेकेदार प्रतिनिधींना सूचना दिल्या. दरम्यान, रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी महानगरपालिका उपाययोजना करत असली तरी काही अडचणी येऊ शकतात.

अशावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत करावी, महानगरपालिकेकडून सर्व सहकारी केले जाईल, असे आवाहनही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे